Maruti EVX Concept: EV कॅटेगरीमध्ये मारुती सुझुकीचे पदार्पण, दोन वर्षात पहिली मारूती EVX येणार रस्त्यावर
Auto Expo 2023 : देशातील सर्वात मोठ्या ऑटो एक्स्पोमध्ये Maruti Suzuki Electric SUV EVX मध्ये धमाकेदार एन्ट्री केली आहे. 2025 सालापर्यंत Electric SUV भारतीय रस्त्यावर उतरणार आहे.
Auto Expo 2023 : बहुप्रतिक्षीत EV कॅटेगरीमध्ये मारुती सुझुकी EVX (Maruti Suzuki Electric SUV EVX) लवकरच रस्त्यावर धावणार आहे. देशातील सर्वात मोठ्या ऑटो एक्स्पोमध्ये (Auto Expo 2023) Maruti Suzuki Electric SUV EVX मध्ये धमाकेदार एन्ट्री केली आहे. 2025 सालापर्यंत Electric SUV भारतीय रस्त्यावर उतरणार आहे. भारतीय ग्राहकांना अनेक दिवसांपासून या कारची प्रतीक्ष होती, अखेर ही प्रतीक्षा संपली आहे.
Maruti Suzuki Electric SUV EVX मध्ये 60kwh ची बॅटरी आहे. एका चार्जमध्ये ही कार 550 KM धावणार असल्याचा दाव कंपनीने केला आहे. कारची लांबी 4 मीटर आहे. कारची लांबी जास्त असल्याने आकर्षक दिसते. मारूतीची हे इलेक्ट्रिक SUV कार गुजरात मध्ये बनवण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक कार नेक्साच्या आउटलेटमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
Maruti Suzuki Electric SUV EVX आहे खास
ही सर्वात मोठी SUV ठरणार आहे. ग्राहकांसाठी फुल हायब्रिड हा पर्याय देखील उपलब्ध असणार आहे. मारुतीने SUV कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक कार देशातील वातावरणाचा विचार करून तयार करण्यात आली आहे. मारुतीच्या कारची लांबी 4300 मीमी, लांबी 1800 मीमी आणि उंची 1600 मीमी आहे. तसेच एलईडी लाईटची सुविधा देखील देण्यात आली आहे. एलईडी टेल लाईट्सची देखील सुविधा देण्यात आली आहे.
केव्हा होणार लॉन्च?
मारूती सुझुकीने ऑटो एक्स्पो 2023 मध्ये पदार्पण केली आहे. बाजारात येण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. कंपनीच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार इलेक्ट्रिक SUV 2025 पर्यंत बाजारात येईल. कॉन्सेप्ट EVX ही ग्लोबल स्ट्रॅटजिक इलेक्ट्रिल व्हेकिल आहे. सर्वात पहिल्यांदा भारतात येणार आहे.
नोएडामध्ये देशातील सर्वात मोठा ऑटो एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील दिग्गज ऑटोमोबाईल कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. अनेक आधुनिक आणि नाविन्यपूर्ण गाड्याही बघायला मिळणार आहे. 18 जानेवारीपर्यंत ऑटो एक्स्पो चालणार आहे.
संबंधित बातम्या :