या वर्षाच्या शेवटी लॉन्च होऊ शकते Mahindra eKUV, 'या' फीचर्ससह किंमत असले
Mahindra eKUV: वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा या वर्षाच्या अखेरीस आपली नवीन eKUV लाँच करू शकते. कंपनीने ही कार 2020 ऑटो एक्सपोमध्ये सादर केली होती.

Mahindra eKUV: वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा या वर्षाच्या अखेरीस आपली नवीन eKUV लाँच करू शकते. कंपनीने ही कार 2020 ऑटो एक्सपोमध्ये सादर केली होती. बाजारातली परिस्थिती आणि स्पर्धा पाहता कंपनीने या आधी जाहीर केलेल्या किमतीत ही कार लॉन्च करू शकते, असे जाणकारांचे मत आहे. eKUV ही कार एप्रिल 2020 मध्ये 8.25 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) मध्ये लॉन्च केली जाणार होती. जाणकारांचे म्हणणे आहे की, इलेक्ट्रिक XUV300 कार 2023 च्या सुरुवातीला बाजारात येईल आणि eKUV100 चाचणीच्या अंतिम टप्प्यात असून ही कार 2022 च्या अखेरीस बाजारात येईल. KUV च्या पहिल्या मॉडेलला भारतात फारसे यश मिळाले नसल्यामुळे याला e2O या नवीन नावाने पुन्हा लाँच केले जाऊ शकते. भारतीय बाजारात कंपनी आपली ही इलेक्ट्रिक कार 10 लाख रुपयांच्या किमतीत लॉन्च करू शकते.
महिंद्राचा इलेक्ट्रिक वाहनांचा व्यवसाय भारतीय बाजारात एका महत्त्वपूर्ण वळणावर आहे. कंपनीच्या वैयक्तिक इलेक्ट्रिक प्रवासी वाहनाची विक्री अद्याप सुरू झालेली नाही. यातच UV ने Treo आणि eAlpha सारख्या उत्पादनांसह प्रमुख ट्रायसायकल आणि लहान LCV सेगमेंटमध्ये सर्वाना मागे टाकले आहे. तर पर्सनल सेगमेंटमधील इलेक्ट्रिक कारच्या पोर्टफोलिओसह प्रतिस्पर्धी टाटा मोटर्स अलीकडच्या काळात 70% पेक्षा जास्त मार्केट शेअरसह आघाडीवर आहे. अशातच यांच्याशी स्पर्धा करणं कंपनीला कठीण जाऊ शकतं.
यापूर्वी मार्च 2021 मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड (MEML), एक स्टेप-डाउन या उपकंपनी मुख्य कंपनीमध्ये मर्ज करण्यात आली होती. इलेक्ट्रिक मोबिलिटीवर लक्ष केंद्रित करण्याचा एक भाग म्हणून कंपनीने लास्ट माईल मोबिलिटी (LMM) आणि SUV EV प्लॅटफॉर्मच्या लॉन्चमधील संधींचा फायदा घेण्यासाठी 3,000 कोटी रुपयांची नवीन भांडवली गुंतवणूक जाहीर केली आहे. येत्या 3-5 वर्षांत कंपनीची इलेक्ट्रिक वाहने बाजारात येतील.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
