Car : Hyundai Venue की Kia Sonet; कोणती कार सर्वात भारी? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Hyundai Venue vs Kia Sonet : SUV वर आधारित असलेल्या Hyundai Venue आणि Kia Sonet यापैकी कोणती कार सर्वात दमदार फिचर्स देते हे जाणून घ्या.
Hyundai Venue vs Kia Sonet : कार निर्माता कंपनी Hyundai आणि Kia Sonet या दोन्ही SUV वर आधारित असलेल्या कारने एकमेकांशी स्पर्धा केली आहे. या दोन्ही कारचे फिचर्स उत्कृष्ट आहेत. इंजिन दमदार आहे. टर्बो-पेट्रोलवर चालणाऱ्या या कार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ड्रायव्हिंगचा उत्तम अनुभव देणाऱ्या या कार आहेत. या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत या दोन्ही कारमधील नेमकी कोणती कार सर्वात भारी आहे. चला जाणून घेऊयात.
कोणती कार मोठी?
या दोन्ही SUV संबंधित कार आहेत. लांबीच्या बाबतीत बघायचे झाल्यास दोन्ही कारची लांबी सारखीच आहे. म्हणजेच ही लांबी 3995mm इतकी आहे. तर, रूंदीने बघायचे झाल्यास Sonet ची रूंदी किंचित Hyundai पेक्षा जास्त आहे. सोनेटची रूंदी1790mm आहे तर, ह्युंदाईची रूंदी 1770mm आहे. मात्र, असे म्हटले जाते की, उंचीच्या बाततीत ह्युंदाई सोनेटच्या पुढे आहे. ह्युंदाईची उंची 1617 आहे तर सोनेटची उंची 1610 आहे. दोघांचाही व्हीलबेस 2500mm वर समान आहे.
इंटिरियर बद्दल काय?
कारच्या इंटीरियरमध्ये वापरल्या गेलेल्या मटेरियलबद्दल बोलायचे झाल्यास, यातील पार्टसुद्धा 4m वरील SUV किंवा इतर कार Creta/Seltos सारखेच आहेत. Sonet मध्ये क्रोम स्विचेस आहेत जे सेल्टोस सारखे आहेत. तर स्टीयरिंग व्हील आणि एअर प्युरिफायर Creta सारखे आहे. कारची मागील सीट अत्यंत आरामदायी आहे. फिचर्सच्या बाबतीत बघितल्यास, सनरूफ, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, एअर प्युरिफायर, कनेक्टेड कार टेक, क्लायमेट कंट्रोल, रिअर व्ह्यू कॅमेरा, प्रीमियम ऑडिओ सिस्टम आणि बरेच काही फिचर्स कारमध्ये जोडले गेले आहेत. सोनेटला फ्रंट पार्किंग सेन्सर्स आणि हवेशीर जागा मिळतात तर व्हेन्युला पॉवर्ड ड्रायव्हर सीट मिळते. सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही कार सुसज्ज आहेत.
इंजिन?
दोन्ही SUV मध्ये 1.2l पेट्रोलसह समान इंजिन पर्याय आहेत जे 83bhp बनवते आणि ज्याला मानक 5-स्पीड मॅन्युअल मिळते. मात्र, तुम्ही जर 1.0l टर्बो पेट्रोल घेतले तर 120bhp विकसित करते आणि हे तुम्हाला iMT क्लचलेस मॅन्युअल किंवा पॅडल शिफ्टर्ससह 7-स्पीड DCT सोबत मिळू शकते.
1.5l डिझेल हे देखील एक महत्त्वपूर्ण इंजिन आहे कारण डिझेल अजूनही स्थिर आहे आणि येथे Sonet कडे ड्राईव्ह मोडसह अधिक पॉवरफुल स्वयंचलित व्हर्जन आहे. दोन्ही SUV चालविण्यास उत्तम आहेत आणि त्यांच्या लाइट स्टीयरिंग आणि कॉम्पॅक्ट SUV मुळे आरामायी आहेत. सोनेटमध्ये अधिक मजबूत सस्पेंशन आहे परंतु त्याच्या स्टीयरिंगसह अधिक वजन आहे.
किंमत किती?
ह्युंदाईची किंमत 7.5 लाख रुपये आहे आणि ती 12.7 लाख रुपयांपर्यंत जाते. तर, सोनेटची किंमत 7.4 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 13.7 लाख रुपयांपर्यंत जाते.
महत्वाच्या बातम्या :