Car : Tata Punch ला टक्कर द्यायला लवकरच येतेय 'Hyundai Exter'; किंमत माहितीये?
Hyundai Exter Launch : नवीन Xeter SUV मध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आणि फॅक्टरी फिट सीएनजी किट मिळू शकते.
Hyundai Exter Launch : भारतात लहान SUV कार खूप पसंत केल्या जात आहेत आणि हॅचबॅक खरेदी करणारे ग्राहक देखील या सेगमेंटकडे वळत आहेत. टाटा पंच (Tata Punch) आणि मारुती सुझुकी फ्रँक्स (Maruti Suzuki Fronx) या सेगमेंटमध्ये चांगली विक्री करतायत. या सेगमेंटची लोकप्रियता पाहून Hyundai Motor 'Exter micro' SUV लाँच करणार आहे. या कारची किंमत 10 जुलै रोजी जाहीर केल्या जातील. ही कंपनीची सर्वात छोटी आणि स्वस्त एसयूव्ही कार असेल असं कंपनीचं म्हणणं आहे.
कारचे इंजिन कसे आहे?
नवीन Xeter SUV मध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आणि फॅक्टरी फिट सीएनजी किट मिळू शकते. 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स असे दोन्ही पर्याय पेट्रोल इंजिनसह उपलब्ध असतील. तर CNG सह फक्त मॅन्युअल ट्रान्समिशन उपलब्ध असेल. यात असणारे पेट्रोल इंजिन 83bhp पॉवर आणि 114Nm टॉर्क जनरेट करते. त्याचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी Tata Punch ला 1.2L, 3-सिलेंडर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते, जे 86bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सचा पर्याय आहे. त्याचे सीएनजी व्हर्जन लवकरच लॉन्च होणार आहे.
कारचं वैशिष्ट्य काय?
कारच्या वैशिष्ट्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, Hyundai Xter ही कार Punch पेक्षा लांबी आणि रूंदीने मोठी असेल. त्याची लांबी 3800-3900 मिमी, उंची 1631 मिमी आणि व्हीलबेस 2450 मिमी असेल, तर Punch ची लांबी 3700 मिमी, रुंदी 1690 मिमी, उंची 1595 मिमी आणि व्हीलबेस 2435 मिमी असेल.
कारचे अधिक फिचर्स कोणते?
नवीन Xeter मध्ये ड्युअल कॅमेरा आणि इलेक्ट्रिक सनरूफसह डॅशकॅम मिळेल. याबरोबरच यात स्टँडर्ड 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, आयसोफिक्स, हिल होल्ड असिस्ट, 3-पॉइंट सीट बेल्ट आणि सर्व सीट सीटबेल्ट रिमाइंडर आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टमसह इतर अनेक वैशिष्ट्ये देखील मिळतील.
कारची किंमत किती?
कंपनीने आधीच 11,000 रुपयांच्या रकमेसह Hyundai Xter ची बुकिंग सुरू केली आहे. ही मिनी एसयूव्ही पाच ट्रिमच्या एकूण 15 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. EX, S, SX, SX (O), आणि SX (O) Connect यांसह अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या कारची किंमत 6 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Car : Maruti Invicto की Toyota Innova Hycross कोणती कार सर्वात भारी? वाचा संपूर्ण माहिती