Hyundai Exter Micro SUV : Hyundai ची ही नवीन कार Tata Punch ला देणार जबरदस्त टक्कर, नाव आहे 'Exter'
Hyundai Exter Micro SUV : Hyundai ची आगामी नवीन SUV खासकरून भारतासाठी बनवण्यात आली आहे. या कारचे डिझायनिंग देखील भारतीय बाजारपेठेला लक्षात घेऊन केले गेले आहे.
Hyundai Exter Micro SUV : भारतीय बाजारात एसयूव्ही (SUV) सेगमेंटमधील परवडणाऱ्या दरात आता आणखी एका कारची लवकरच एन्ट्री होणार आहे. Hyundai Cars ने आज भारतीय बाजारात लवकरच सादर होणार्या आपल्या नवीन SUV चे नाव जाहीर केले आहे, ज्याचे नाव Exter असं देण्यात आलं आहे. असं सांगितलं जातं की, ही कार लॉंच झाल्यानंतर Hyundai Exter ची स्पर्धा Tata Panch, Nissan Magnite Plus आणि Citroën C3 शी होणार आहे.
Hyundai Xter फक्त भारतासाठी बनवले आहे
Hyundai ची आगामी नवीन SUV खास भारतासाठी बनवण्यात आली असून तिचे डिझायनिंगही भारतीय बाजारपेठेला लक्षात घेऊन करण्यात आले आहे. ही Hyundai micro SUV कॅस्पर सारख्या काही जागतिक बाजारपेठांमध्ये उपलब्ध होणार नाही. परंतु, काही वैशिष्ट्ये, स्पेसिफिकेशन्स नक्कीच कॅस्परकडून घेतली जाऊ शकतात. Hyundai Exter ही भारतासाठी बनवण्यात आली आहे. याचाच अर्थ ही एक उत्तम दर्जाची कार असेल.
Hyundai Exter इंजिन कसे आहे?
नवीन Hyundai Exter Nios प्रमाणेच K1 प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येईल. ज्यामध्ये 1.2l नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन जे 82 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करेल. जे 5-स्पीड ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशनसह ऑफर केले जाईल. या कारच्या आकाराबद्दल बोलायचे झाल्यास, ही कार ह्युंदाई वेन्यू पेक्षा लहान असणार आहे. टीझरमध्ये दाखवल्याप्रमाणे कॅस्परचे नाव आणि त्याचे स्थान तरुणाईच्या लाईफस्टाईलनुसार ठेवण्यात आले आहे.
Hyundai EXter वैशिष्ट्ये कोणती?
Hyundai EXter ही कार 2023 या वर्षाच्या अखेरीस तसेच सणासुदीच्या दरम्यान लॉंन्च केली जाऊ शकते. या कारला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह मोठ्या टचस्क्रीनसारखी हाय क्वालिटी एक्विपमेंट्स मिळण्याची अपेक्षा आहे आणि बाकीच्या Hyundai कार प्रमाणेच हवामान नियंत्रणासारखी आणखी काही वैशिष्ट्ये देण्यात येतील. Exter ला मात्र टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात येणार नाही, ते व्हेन्यूमध्ये दिले जाईल.
किंमत किती?
मायक्रो एसयूव्ही सेगमेंटमधील वाढती मागणी लक्षात घेता, भारतीय बाजारपेठेत Hyundai Exter ची गरज आहे. Hyundai आपली सर्वात छोटी एसयूव्हीची किंमत 6 लाख रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. तसेच, या कारच्या सादरीकरणामुळे एसयूव्ही सेगमेंटच्या विक्रीतही वाढ झालेली दिसून येते. सध्या, Hyundai SUV सेगमेंटमध्ये स्पर्धा करण्यासाठी Hyundai Creta आणि Venue बाजारात उपलब्ध आहेत. आता Hyundai च्या एंट्री-लेव्हल SUV EXter च्या येण्याने, भारतातील Hyundai लाईनअपमध्ये मायक्रो SUV देखील जोडली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या :