कार आणि बाईकसाठी VIP क्रमांक हवाय? 'या' सोप्या 7 स्टेप्स फॉलो करा आणि मिळवा तुमचा आवडता क्रमांक
Car/Bike VIP Number : अनेकदा बाईक आणि वाहनांच्या ग्राहकांना आपल्या वाहनांवर व्हीआयपी क्रमांक लावायचा असतो.
Car/Bike VIP Number : चांगल्या आणि जबरदस्त कार (Car) आणि बाईकची (Bike) क्रेझ लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. अनकेदा बाजारात नवीन कोणतं मॉडेल आलं आहे याबद्दल लोक फार उत्सुक असतात. काही लोकांना कार आणि बाईकमध्ये लावलेल्या एलईडीचं वेड असतं. तर, काही जर फॅन्सी नंबर प्लेटचे शौकीन असतात. काहींना बाईक, कारच्या सीटबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते तर काही जर आपल्या कारसाठी व्हीआयपी नंबरच्य शोधात असतात. या ठिकाणी आम्ही तुम्हाला आपल्या कार किंवा बाईकसाठी युनिक नंबर कसा शोधायचा या संदर्भात काही माहिती सांगणार आहोत.
'या' 7 सोप्या स्टेप्स फॉलो करून VIP नंबर मिळवा
या सात सोप्या स्टेप्सच्या मदतीने व्हीआयपी नंबर प्रेमींना त्यांचा आवडता क्रमांक मिळू शकतो. या सोप्या स्टेप्स फॉलो करून कार आणि बाईकसाठी व्हीआयपी क्रमांक मिळवता येतो.
1. व्हीआयपी क्रमांक मिळविण्यासाठी, सर्वात आधी तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला भारत सरकार, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वेबसाईटवर जावे लागेल. या ठिकाणी सार्वजनिक ग्राहक म्हणून नोंदणी करावी लागेल.
2. नोंदणी केल्यानंतर, तेथे तुम्हाला हवा असलेला VIP क्रमांक टाका.
3. यानंतर नोंदणी फी आणि व्हीआयपी नंबर बुकिंग फी भरा.
4. पेमेंट केल्यानंतर, तुम्ही तुमच्या निवडलेल्या नंबरच्या बिडींग प्रक्रियेत सहभागी होऊ शकाल. कारण अनेकदा असंही होऊ शकते की, तुम्ही जो नंबर निवडला असेल त्यावर इतर कोणीतरी नोंदणी केली असेल. अशा वेळी तुमचा आवडता क्रमांक मिळवण्यासाठी तुम्हाला बिडींग प्रक्रियेचा एक भाग व्हावे लागेल.
5. बिडिंग दरम्यान तुम्हाला VIP नंबरसाठी अतिरिक्त रक्कम भरावी लागेल. व्हीआयपी क्रमांक मिळाल्यानंतर उर्वरित रक्कमही जमा करा.
6. यानंतर, तुमच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जा आणि तुमचा व्हीआयपी क्रमांक मिळवण्याबाबत माहिती मिळवा आणि मिळालेल्या क्रमांकानुसार तुमच्या वाहनावर टाका.
7. अशा प्रकारे तुम्हाला व्हीआयपी क्रमांक मिळू शकेल. व्हीआयपी क्रमांक मिळविण्यासाठी, सामान्य संख्येच्या तुलनेत अतिरिक्त निधी जमा करावा लागतो.
वरील सात स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीचा व्हीआयपी क्रमांक अगदी काही दिवसांतच मिळू शकेल. तसेच, नंबर प्लेट सिलेक्ट करताना युनिक नंबरची शोधा.