Honda Shine Celebration Addition : आता Honda Shine नवीन रंगात सादर, लूकमध्ये झाला 'हा' बदल; वाचा संपूर्ण बातमी
Honda Shine Celebration Addition : होंडा शाइनच्या नवीन सेलिब्रेशन एडिशनमध्ये (Honda Shine Celebration Edition) गोल्डन थीम वापरण्यात आली आहे.
Honda Shine Celebration Addition : Honda Motorcycle & Scooter India हे सतत त्यांच्या वाहनांमध्ये (Car) नवीन काहीतरी बदल करत असतात. या अजेंडा पुढे नेत कंपनीने आता Honda Shine Celebration Edition लॉन्च केली आहे. हॉन्डा (Honda) ही देशातील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. या कारमध्ये आवश्यक असे बदल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर दोन नवीन कलर ऑप्शनही यामध्ये देण्यात आले आहेत. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 78,878 रुपये इतकी आहे.
'हे' बदल करण्यात आले (Features) :
नवीन Honda Shine Celebration Edition मध्ये सीट कव्हरचा कलर बदलून ब्राऊन कॉस्मेटिक अपडेटेट कलर देण्यात आला आहे. तसेच, ही बाईक मॅट स्टील ब्लॅक मेटॅलिक आणि मॅट संगरिया रेड मेटॅलिक अशा दोन नवीन कलरमध्ये उपलब्ध असेल. या बदलांनंतर बाईकला प्रीमियम लूक मिळेल.
लूक कसा असेल? (Honda Shine Celebration Edition Look) :
होंडा शाइनच्या नवीन सेलिब्रेशन एडिशनमध्ये (Honda Shine Celebration Edition) गोल्डन थीम वापरण्यात आली आहे. यामध्ये इंधन टाकीवर गोल्डन विंग मार्क, फ्रेश बार लाईन आणि सेलिब्रेशन लोगो देण्यात आला आहे. जे या नवीन बाईकला प्रीमियम लूक देतील.
Honda Shine Celebration Edition Engine मध्ये 'हे' इंजिन असेल
ही बाईक 124 cc इंजिनसह येते, जी 7500 rpm वर 10.74 PS पॉवर आणि 6000 rpm वर 11 Nm टॉर्क जनरेट करू शकते. याला पुढील बाजूस CBS सह ड्रम किंवा डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक मिळतात. या बाईकमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
होंडा शाइन डिझाइन (Honda Shine Design) :
या सेलिब्रेशन एडिशन बाईकला नवीन लूक देण्यासाठी सॅडल ब्राऊन सीट, मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक मफलर कव्हर, गोल्डन कलरचा सेलिब्रेशन लोगो (Logo) वापरण्यात आला आहे. या सर्व गोष्टी मिळून या बाईकला एक रॉयल आणि आकर्षक असा लूक देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :