येत आहे Honda ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर; हटके लूकसह मिळणार हे फीचर्स
Honda Electric Scooter: इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता बाजार पाहून आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्या यात उडी घेत आहेत. यात आता आणखी एक कंपनीचं नाव सामील झालं आहे, ही कंपनी आहे Honda.
Honda Electric Scooter: इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता बाजार पाहून आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्या यात उडी घेत आहेत. यात आता आणखी एक कंपनीचं नाव सामील झालं आहे, ही कंपनी आहे Honda. होंडा लवकरच आपली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची भारतातील रस्त्यांवर चाचणी सुरू केली आहे. अलीकडे Honda ची Benly e (Honda Benly-e) इलेक्ट्रिक स्कूटर कर्नाटकातील बेंगळुरू शहरात चाचणी दरम्यान दिसली आहे.
Honda ची Benly e स्कूटर जपानसह आशियातील अनेक दक्षिण-पूर्व देशांमध्ये आधीच विकली जात आहे. ही एक कार्गो ई-स्कूटर आहे. जी डिलिव्हरी आणि कुरिअरसाठी वापरली जाऊ शकते. समोर आलेल्या फोटोत दिसत असल्या प्रमाणे, ही स्कूटर पांढऱ्या रंगाची असून तिच्या समोर एक मोठा सामानवाहक बसवण्यात आला आहे. ही सिंगल सीटर ई-स्कूटर आहे आणि याला मागील सीटऐवजी लगेज कॅरिअर देखील मिळतो. एक मोठा सामानाचा डबा किंवा बॅग मागील कॅरियरवर ठेवता येऊ शकतो. ही ई-स्कूटर डिलिव्हरी आणि कुरिअर सेवेसाठी एक व्यावहारिक स्कूटर असल्याचे सिद्ध होऊ शकते.
भारतीय बाजारात कंपनी Honda Cliq ही व्यावसायिक स्कूटर म्हणून विकत आहे. तर Honda Benly e चार मॉडेल्समध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सादर करण्यात आली आहे. या प्रकारांमध्ये Benly e: I, Benly e: I Pro, Benly e: II आणि Benly e: II Pro चा समावेश आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर आंतरराष्ट्रीय बाजारात विविध बॅटरी पॅक आणि पर्यायांसह उपलब्ध आहे. बेस मॉडेलला 2.8 kW ची इलेक्ट्रिक मोटर मिळते, तर अधिक पॉवरफुल मॉडेलला 4.2 kW ची इलेक्ट्रिक मोटर मिळते. सर्व प्रकारांमध्ये दोन स्वॅप करण्यायोग्य 48V बॅटरी आहेत.
Benly इलेक्ट्रिक स्कूटरची आधीच चाचणी सुरू असल्याने, ही स्कूटर आगामी होंडा अॅक्टिव्हा इलेक्ट्रिक स्कूटरचा भारतात पाया रचेल, असे मानले जाऊ शकते. होंडाच्या आंतरराष्ट्रीय उत्पादन पोर्टफोलिओमध्ये इतर अनेक इलेक्ट्रिक स्कूटर्सचा समावेश आहे. यामध्ये Honda PCX इलेक्ट्रिक आणि Honda Gyro इलेक्ट्रिक स्कूटरचा समावेश आहे. EV स्पेसमध्ये Honda च्या बऱ्याच मोठ्या योजना आहेत. कंपनीने अलीकडेच बॅटरी पॅक तयार करण्यासाठी नवीन उपकंपनी स्थापन केली आहे. ही नवीन उपकंपनी 133 कोटी रुपयांच्या भांडवलाने स्थापन करण्यात आली आहे.