Honda City Facelift: नवीन अवतारात येणार होंडा सिटी फेसलिफ्ट, जाणून घ्या कधी होणार लॉन्च
Honda City Facelift: भारतात होंडा सिटी ही सर्वाधिक खरेदी होणाऱ्या कारपैकी एक आहे. जपानची वाहन उत्पादक कंपनी होंडाची भारतात ही सर्वात पंसती केली जाणार कार आहे. आता कंपनी लवकरच यात नवीन बदल करून ही कार पुन्हा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
Honda City Facelift: भारतात होंडा सिटी ही सर्वाधिक खरेदी होणाऱ्या कारपैकी एक आहे. जपानची वाहन उत्पादक कंपनी होंडाची भारतात ही सर्वात पंसती केली जाणार कार आहे. आता कंपनी लवकरच यात नवीन बदल करून ही कार पुन्हा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Honda Cars India आपल्या सिटी सेडानच्या पाचव्या जनरेशन मॉडेलचे फेसलिफ्ट व्हर्जन आणण्याच्या तयारीत आहे. अलीकडे थायलंडमध्ये होंडा सिटी फेसलिफ्ट टेस्टिंग दरम्यान दिसली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी सर्वात आधी थायलंडमध्ये सिटी फेसलिफ्ट लॉन्च करू शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, सिटी सेडानमध्ये किरकोळ बदल केले जाऊ शकतात. इंजिन सध्याच्या मॉडेलचे असेल तर कंपनी त्याच्या डिझाइनमध्ये बदल करू शकते. एका रिपोर्टनुसार, नवीन होंडा सिटी भारतात 2024 मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. ही कार फक्त पेट्रोल इंजिनमध्ये कंपनी लॉन्च करू शकते. टेस्टिंग दरम्यान दिसलेल्या मॉडेलच्या फोटोनुसार, होंडा सिटी फेसलिफ्टमध्ये किरकोळ डिझाइन बदल झाले आहेत. ज्यामध्ये नवीन फॉग लॅम्प हाउसिंग आणि एअरडॅमसह फ्रंट बंपर समाविष्ट आहे. सिटी फेसलिफ्टला रीस्टाइल केलेले मागील बंपर देखील मिळण्याची शक्यता आहे. इंटीरियरवर कंपनी इन्फोटेनमेंट सिस्टम अपडेट करेल आणि आणखी उपकरणे जोडेल, अशी अपेक्षा आहे.
Honda City चे फेसलिफ्ट 1.5-लीटर पेट्रोल तसेच सध्याच्या मॉडेलवर पेट्रोल-हायब्रिड पर्यायासह येण्याची अपेक्षा आहे. Honda पुढील वर्षाच्या सुरुवातीला डिझेल इंजिन लाइनअप सोडण्याच्या तयारीत आहे. कंपनी BS6 उत्सर्जन मापदंडांच्या नवीन टप्प्यासह भारतातील डिझेल इंजिन लाइनअप बंद करणार आहे.
Honda ने आधीच जाहीर केले आहे की. सध्याचे gen Jazz, WR-V आणि 4th-gen City लवकरच बंद केले जातील. कंपनी अमेझ आणि सिटी सेडानची विक्री करेल आणि त्याचवेळी Hyundai Creta ला टक्कर देण्यासाठी नवीन कॉम्पॅक्ट SUV लॉन्च करेल. सध्या Honda भारतात WR-V subcompact SUV देत आहे. मात्र ही SUV भारतात आतापर्यंत कंपनीसाठी काही कमाल दाखवू शकली नाही. Honda ची नवीन SUV भारतात लॉन्च झाली तर ती मारुती ब्रेझा, ह्युंदाई व्हेन्यू, किया सॉनेट आणि निसान मॅग्नाइटशी स्पर्धा करेल.
दरम्यान, होंडा भारतातील मध्यम आकाराच्या एसयूव्ही बाजारपेठेत अद्याप प्रवेश करू शकलेली नाही. आत्तापर्यंत कंपनी भारतासाठी नवीन मध्यम आकाराच्या SUV वर काम करत आहे. जी 2023 मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. कंपनी सध्या Amaze, City, City E: HEV (हायब्रिड) आणि WRV ची विक्री करते. कंपनीने नुकतीच इंडोनेशियन मार्केटमध्ये नवीन SUV लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने या SUV चा टीझर देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये कंपनीने या कारचे नाव RS असे ठेवले आहे.