Honda City Facelift भारतात लॉन्च, ADAS तंत्रज्ञानाने सुसज्ज, किंमत 11.49 लाख रुपयांपासून सुरू
Honda City facelift 2023 Launched: कार निर्माता कंपनी Honda ने अखेर आपली नवीन 2023 Honda City Facelift लॉन्च केली आहे.
Honda City facelift 2023 Launched: कार निर्माता कंपनी Honda ने अखेर आपली नवीन 2023 Honda City Facelift लॉन्च केली आहे. या नवीन सेडानच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने यांची किंमत 11.49 लाख ते 20.39 लाख रुपयांच्या दरम्यान ठेवली आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत. ही कार SV, V, VX आणि ZX या चार ट्रिममध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. Honda ने रिअल ड्रायव्हिंग एमिशन (RDE) नियम आणि E20 ची पूर्तता करण्यासाठी दोन्ही इंजिने अपडेट केली आहेत. तसेच यामध्ये आधी जे डिझेल इंजिन दिले जाते होते ते बंद करण्यात आले आहे. नवीन कारमध्ये कंपनीने कोनतेव नवीन फीचर्स दिले आहेत, आणि काय असेल यात खास, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ...
Honda City facelift 2023 Launched: ADAS तंत्रज्ञानाने सुसज्ज
नवीन होंडा सिटी ADAS ने (Advanced Driver Assistance System) सुसज्ज आहे. यासोबतच तुम्हाला 360 डिग्री सेन्सर, मिटिगेशन ब्लाइंड स्पॉट, लेन कीप असिस्ट, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल यांसारखी खास फीचर्स यामध्ये मिळणार आहे. सेफ्टी फीचर्स म्हणून नवीन होंडा सिटीला हिल स्टार्ट असिस्ट, कार स्टेबिलिटी कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, 6 एअरबॅग्ज, एक मल्टी अँगल रिअर व्ह्यू कॅमेरा, ISOFIX चाइल्ड माउंट आणि ORVM-माउंटेड लेन वॉच कॅमेरा देखील मिळतो. यासोबत वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, वायरलेस चार्जर, रेन सेन्सिंग ऑटो वायपर आणि पीएम 2.5 केबिन एअरफिल्टर देखील होंडा सिटीमध्ये पाहायला मिळतील.
Honda City facelift 2023 Launched: इंजिन
नवीन Honda City च्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर, यात 1.5L NA पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 118 bhp पॉवर आणि 145 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यात 6-स्पीड मॅन्युअल किंवा CVT चा पर्याय मिळेल. कंपनीचा दावा आहे की, ही कार सुमारे 18 किमी प्रति लीटर मायलेज देण्यास सक्षम असेल. नवीन सिटीला हायब्रीड इंजिनचा पर्यायही मिळेल. ज्यामध्ये कंपनीचा दावा आहे की, ती 26 kmpl पेक्षा जास्त मायलेज देण्यास सक्षम असेल, जी सेगमेंटमधील एकमेव कार आहे.
Honda City facelift 2023 Launched: नवीन होंडा सिटी डिझाइन, रंग पर्याय
नवीन होंडा सिटीच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर यात किरकोळ बदल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये अपडेटेड पुढील आणि मागील बंपर, नवीन हनीकॉम्ब ग्रिल आणि नवीन डिझाइन 16-इंच अलॉय व्हील उपलब्ध आहेत. मॉडेल लाइनअपला नवीन ऑब्सिडियन ब्लू कलर स्कीम देण्यात आली आहे. इतर रंग पर्यायांमध्ये प्लॅटिनम व्हाईट पर्ल, रेडियंट रेड मेटॅलिक, लुनर सिल्व्हर मेटॅलिक, गोल्डन ब्राऊन मेटॅलिक आणि मेटिओरॉइड ग्रे मेटॅलिक यांचा समावेश आहे.