Upcoming Scooter: Hero Xoom Scooter उद्या होणार लॉन्च, इतकी असेल किंमत
Upcoming Scooter: दुचाकी वाहन उत्पादक Hero MotorCorp उद्या आपल्या स्कूटर Maestro चा अपडेटेड व्हर्जन लॉन्च करणार आहे.
Upcoming Scooter: दुचाकी वाहन उत्पादक Hero MotorCorp उद्या आपल्या स्कूटर Maestro चा अपडेटेड व्हर्जन लॉन्च करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत खूप बदलांसह ही स्कूटर सादर करणार आहे. ज्यामध्ये स्टॉप-स्टार्ट सारखे अनेक नवीन फीचर्स देखील पाहता येतील. यामध्ये कोणते फीचर्स मिळू शकतात आणि याची किंमत किती असू शकते, याबाबत माहिती जाणून घेऊ...
Upcoming Scooter: संभाव्य लूक
कंपनीने सोशल मीडियावर आपल्या स्कूटरची झलक दाखवली आहे. ज्यामध्ये या स्कूटरचा लूक स्पोर्टी दिसत आहे. तसेच हँडलबारऐवजी X चिन्हासह समोरच्या फॅशियावर एलईडी हेडलाइट दिसत आहे. तर समोरच्या प्रकाशात LED टेललाइट्समध्ये X चा वेगळा आकार दिसतो. याशिवाय स्कूटर सध्याच्या मॉडेलपेक्षा अधिक स्पोर्टी लूकमध्ये दिसत आहे.
Upcoming Scooter: मिळू शकतात 'हे' फीचर्स
जर आपण या स्कूटरमध्ये उपलब्ध फीचर्सबद्दल बोललो तर मायलेज देण्यासाठी आणि इंधन वाचवण्यासाठी यामध्ये स्टार्ट/स्टॉप बटण दिसू शकते. यासोबतच बाकीच्या स्कूटर्सप्रमाणे या स्कूटरमध्ये फोन चार्ज करण्यासाठी यूएसबी सुविधाही दिली जाऊ शकते. याशिवाय सामान ठेवण्यासाठी इन्स्ट्रुमेंट कन्सोल अंतर्गत एक स्टोरेज कंपार्टमेंट देखील दिला जाईल.
Upcoming Scooter: संभाव्य इंजिन
हिरो या स्कूटरमध्ये 110.9cc इंजिन वापरू शकतो. जे प्लेजर प्लस आणि मेस्ट्रो एजमध्ये देण्यात आले होते. हे इंजिन 8 bhp पॉवर आणि 8.7 Nm टॉर्क जनरेट करते. याच्या सस्पेन्शनबद्दल बोलायचे झाले तर समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स मिळतील. याशिवाय यात अलॉय व्हील्स आणि फ्रंट डिस्क ब्रेकचा पर्यायही उपलब्ध आहे. यासोबतच स्टील व्हील आणि फ्रंट ड्रम ब्रेक्सचा पर्यायही त्याच्या खालच्या व्हेरिएंटमध्ये दिला जाऊ शकतो. दरम्यान, या स्कूटरच्या किमतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या Hero Maestro च्या किंमत पेक्षा याची किंमत जास्त असू शकते. Hero Maestro ची एक्स-शोरूम किंमत 66,900 रुपये असू शकते.
Honda Activa शी होणार स्पर्धा
होंडाने आपली नवीन अॅक्टिव्हा एच-स्मार्ट तीन ट्रिममध्ये आणली आहे. ज्यामध्ये स्टँडर्ड, डिलक्स आणि स्मार्ट यांचा समावेश आहे. त्यांच्या एक्स-शोरूम किंमती अनुक्रमे 74,536, 77,036 आणि 80,537 रुपये आहे. कंपनीचा दावा आहे की या स्कूटरमध्ये स्मार्ट फाईंड फीचर देण्यात आले आहे. जेणेकरुन जेव्हा ग्राहक स्मार्ट की वापरून स्कूटरला गर्दीत शोधण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा स्कूटर अलार्म वाजतो आणि प्रतिसाद मिळतो. कंपनीने Activa H-Smart मध्ये अनेक नवीन तंत्रज्ञान वापरले आहे. यात 110cc PGM-FI इंजिन देण्यात आले आहे.