Tesla ला देणार टशन, Hyundai ची इलेक्ट्रिक कार Ioniq6 लॉन्च
Hyundai Ioniq 6 Electric Car: इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये आता कार निर्माता कंपनी ह्युंदाई मोटर्सने देखील एंट्री केली आहे. कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक कार Ionic 6 लॉन्च केली आहे.
Hyundai Ioniq 6 Electric Car: इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये आता कार निर्माता कंपनी ह्युंदाई मोटर्सने देखील एंट्री केली आहे. कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक कार Ionic 6 लॉन्च केली आहे. Hyundai ने काही दिवसांपूर्वी Ioniq 6 साठी एक टीझर जारी केला होता, ज्यामध्ये या कारला 'Electrified Streamliner' असे नाव देण्यात आले होते. Hyundai इलेक्ट्रिक कारच्या तंत्रज्ञानावर खूप वेगाने काम करत आहे. जेणेकरून ते Tesla सारख्या कंपनीशी स्पर्धा करू शकतील.
Hyundai च्या 31 हून अधिक इलेक्ट्रिक कार मॉडेल्सच्या यादीमध्ये Ioniq 6 चा समावेश आहे. कंपनीने 2030 पर्यंत 31 इलेक्ट्रिक कार बाजारात उतरवण्याची योजना आखली आहे. Ioniq 6 कंपनीच्या त्याच योजनेचा एक भाग आहे. कंपनीच्या योजनेत Hyundai Motors आणि तिची भागीदार कंपनी Kia Corp आणि प्रीमियम ब्रँड जेनेसिस यांचा समावेश आहे. असे बोलले जात आहे की, Hyundai चा हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर, कंपनीचा जागतिक इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेत सुमारे 12 टक्के वाटा असेल.
टेस्लाच्या गाड्यांना आव्हान देण्याच्या उद्देशाने Hyundai ने ही नवीन इलेक्ट्रिक सेडान कार लॉन्च केली आहे. इंडस्ट्री ट्रॅकर SNE रिसर्चच्या मते, Hyundai आणि Kia यांचा जागतिक स्तरावर ऑटो मार्केटचा सर्वात मोठा वाटा आहे. जागतिक स्तरावर या वर्षाच्या पहिल्या 5 महिन्यांत या कंपन्यांकडे एकत्रितपणे 13.5 टक्के हिस्सा होता. सध्या वेगवान कार विक्रीच्या आधारावर या दोन कंपन्या टेस्ला नंतर 22% च्या शेअरसह जागतिक स्तरावर दुसऱ्या स्थानावर आहेत. हे दोघे लवकरच टेस्लाला तगडी टक्कर देणार असल्याचा अंदाज आहे.
Ioniq 6 बॅटरी
Hyundai ने Ioniq 6 दोन बॅटरी पॅकच्या पर्यायामध्ये लॉन्च केले आहे. ज्यामध्ये एक 77.4 kWh क्षमतेची आणि दुसरी 53 kWh (kW प्रति तास) क्षमतेची आहे. याची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. कंपनी या वर्षाच्या अखेरीपासून दक्षिण कोरियन प्लांटमध्ये Ioniq 6 चे उत्पादन सुरू करेल.