Ampere New Electric Scooter: 2023 ऑटो एक्सपोमध्ये अँपिअर लॉन्च करणार नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, आधुनिक फीचर्सने असेल सुसज्ज
Ampere New Electric Scooter: अँपिअर इलेक्ट्रिक मोबिलिटी (Ampere Electric Mobility) आगामी 2023 ऑटो एक्स्पोमध्ये पाच नवीन दुचाकी आणि तीन चाकी इलेक्ट्रिक वाहने प्रदर्शित करणार आहे.
Ampere New Electric Scooter: अँपिअर इलेक्ट्रिक मोबिलिटी (Ampere Electric Mobility) आगामी 2023 ऑटो एक्स्पोमध्ये पाच नवीन दुचाकी आणि तीन चाकी इलेक्ट्रिक वाहने प्रदर्शित करणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही इलेक्ट्रिक वाहने आधुनिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज असतील, तसेच भारतीय रस्ते आणि वापर-परिस्थितीनुसार अनुकूल असतील. आपल्या नवीन दुचाकी आणि तीन चाकी इलेक्ट्रिक वाहन श्रेणीमध्ये कंपनी उद्योग मानकांनुसार उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि गुणवत्ता वापरणार आहे. ही इलेक्ट्रिक वाहने आधुनिक तसेच सुरक्षित असतील, असा दावा कंपनीने केला आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या नवीन श्रेणीमध्ये नवीन इलेक्ट्रिक स्कूटर असेल जी नवीन डिझाइन आणि तंत्रज्ञानासह सादर केली जाईल. कंपनीचे दुसरे उत्पादन इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर (ई-रिक्षा) असेल जे बाजारात विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरपेक्षा अधिक सुरक्षित असेल. कंपनी या दोन्ही उत्पादनांची निर्मिती स्थानिक पातळीवर करणार आहे. Ampere मेक-इन-इंडिया मोहिमेअंतर्गत स्थानिक उत्पादकांकडून उपकरणे खरेदी करते. कंपनीच्या वाहनांमध्ये वापरल्या जाणार्या इलेक्ट्रिक मोटर्स, बॅटरी आणि इतर पार्टसही भारतातच तयार होतात.
स्कूटरची विक्री वाढली
सध्या अँपिअर इलेक्ट्रिक (Ampere Electric Scooter) भारतात दुचाकी आणि तीन चाकी इलेक्ट्रिक वाहनांचे (Four Wheeler Electric Car) उत्पादन करत आहे. ही कंपनी देशातील तिसरी सर्वात मोठी इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक आहे. वाहन पोर्टलच्या आकडेवारीनुसार, या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत अँपिअरने आतापर्यंतची सर्वाधिक 33,000 युनिटची विक्री नोंदवली आहे. कंपनी किरकोळ बाजार तसेच ई-वाहनांच्या घाऊक बाजारावर लक्ष केंद्रित करत आहे. यासाठी कंपनी आपल्या बिझनेस टू कस्टमर पोर्टफोलिओमध्ये सुधारणा करत आहे.
River Electric Scooter लवकरच होणार लॉन्च
इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्टार्टअप (two-wheeler startup) रिव्हर लवकरच भारतात आपली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. अलीकडेच कंपनीची स्कूटर टेस्टिंग दरम्यान दिसली होती. या इलेक्ट्रिक स्कूटरला बॉक्सी डिझाइन देण्यात आली आहे. 2023 च्या मध्यापर्यंत ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याची कंपनीची योजना आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) 100 ते 180 किलोमीटरची रेंज देऊ शकते. ही इलेक्ट्रिक स्कूटर अवघ्या चार सेकंदात 0-40 किमी/ताशी वेग पकडू शकते. याची टॉप स्पीड 80 किमी/तास आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
जबरदस्त रेंजसह लॉन्च होणार ही मेड इन इंडिया स्कूटर, मिळणार हायटेक फीचर्स