जबरदस्त रेंजसह लॉन्च होणार ही मेड इन इंडिया स्कूटर, मिळणार हायटेक फीचर्स
River Electric Scooter: भारतात इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. यातच अनेक नवीन वाहन उत्पादक कंपनी देशात इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करत आहेत.
River Electric Scooter: भारतात इलेक्ट्रिक वाहनांना (electric vehicle) मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या वाहनांचे इलेक्ट्रिक व्हर्जन आणत आहेत. यातच काही नवीन कंपनीही आहेत, ज्या नव्याने या क्षेत्रात उतरले असून आपले इलेक्ट्रिक वाहन लॉन्च केले आहे किंवा करत आहेत. अलीकडे इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्टार्टअप (two-wheeler startup) रिव्हर आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक दुचाकीची टेस्ट करताना दिसली आहे. रिव्हर गेल्या दोन वर्षांपासून आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्ट घेत आहे. 2023 च्या मध्यापर्यंत ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याची कंपनीची योजना आहे. रिव्हर इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिझाइनबद्दल सांगायचे तर, याला बॉक्सी डिझाइन देण्यात आले आहे. याच्या समोर मोठ्या आकाराचे ड्युअल एलईडी हेडलाइट्स देण्यात आले आहेत. हेडलाइटमध्येच एलईडी डीआरएल उपलब्ध आहे.
याशिवाय या स्कूटरमध्ये एलईडी टेललाइट आणि टर्न इंडिकेटर देण्यात आले आहेत. समोर आलेल्या फोटोनुसार या ई-स्कूटरमध्ये क्लिप-ऑन हँडल बार देण्यात आला आहे. या स्कूटरमध्ये मोठा डिजिटल डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. स्कूटरच्या दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक उपलब्ध आहेत. यात चौकोनी आकाराचा रियर व्ह्यू मिरर देखील मिळतो. काही रिपोर्टनुसार, ही एक 'मल्टी युटिलिटी' इलेक्ट्रिक स्कूटर असेल जी 100 ते 180 किलोमीटरची रेंज देईल. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरला RX-1 कोड नेम दिले आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर अवघ्या चार सेकंदात 0-40 किमी/ताशी वेग पकडू शकते. याची टॉप स्पीड 80 किमी/तास आहे.
सर्व प्रकारच्या गरजांसाठी याचा वापर केला जाणार असल्याने याची भार वाहून नेण्याची क्षमता 200 किलो असेल. भारतात ही ओला इलेक्ट्रिक, एथर एनर्जी, हीरो इलेक्ट्रिक, ओकिनावा आणि सिंपल एनर्जी सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करेल. कंपनी ही ई-स्कूटर भारतात 80 हजार ते 1 लाख रुपयांच्या दरम्यान लॉन्च करू शकते. सध्या या स्कूटरची संपूर्ण माहिती समोर आलेली नाही. कंपनीबद्दल बोलायचे तर कंपनीची स्थापना अरविंद मणी आणि विपिन जॉर्ज यांनी 2020 मध्ये केली होती. कंपनीला Maniev Mobility and Trucks VC कडून 2 मिलियन डॉलर्स गुंतवणूक मिळाली आहे.
इतर महत्वाची बातमी: