Electric Scooter: ई-स्प्रिंटोची नवी हाय-स्पीड 'अमेरी' स्कूटर लाँच, एका चार्जवर 140 किलोमीटर धावणार
Electric Scooter: सध्या देशात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी चांगलीच वाढली आहे. ई-स्प्रिंटोने त्यांची अमेरी' ही नवी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे.
Electric Scooter: सध्या इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric Scooter) मागणी चांगलीच वाढली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळेच अनेक वाहन उत्पादक आपले नवनवीन इलेक्ट्रिक वाहन बाजारात उतरवत आहेत. यामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. तसेच इलेक्ट्रिक स्कूटर या पर्यावरणपूरक असल्याने त्या खरेदी करण्यासाठी नागरिकांचा कल आहे. याचसाठी ई-स्प्रिंटोने त्यांची 'अमेरी' ही नवी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. रिमोट कंट्रोल लॉक, चोरीसाठी अलार्म, मोबाइल चार्जिंग सॉकेट यांसारखी वैशिष्ट्ये या स्कूटरमध्ये आहेत. तसेच खास 20 ते 25 वयोगटाला समोर ठेवून ही ई-स्कूटरची डिझाइन करण्यात आली आहे.
ही 'अमेरी' स्कूटर वैशिष्ट्यपूर्ण अशा डिझाइने समृध्द आहे तर यातील अभियांत्रिकी बाबी देखील तितक्याच खास आहेत. ही स्कूटर तीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. ब्लिसफुल व्हाईट, स्टर्डी ब्लॅक आणि हाई स्पिरीट यलो असे या स्कूटरचे तीन रंग आहेत. या स्कूटर आरामदायी तितकीच गतिमान असणार आहे. फ्रंट डिस्क आणि रियर ड्रम ब्रेक यांमुळे या स्कूटरच्या सुरक्षिततेची हमी असल्याचे कंपनीने सांगितले आहे. 1500 वॅट बीएलडीसी हब मोटर, 2500 वॅटची पीक पॉवर यांमुळे ही स्कूटर सहा सेकंदात 0 ते 40 किमी अंतर सहज पार करु शकते. तर ही स्कूटर 65 किमी प्रतितास वेगाने प्रवास करु शकते. या स्कूटरच्या कमाल फिचर्समुळे जास्त अंतराचा प्रवास सहज करता येतो. या स्कूटरची किंमत हि 1,29,000 रुपये इतकी आहे.
ई-स्प्रिंटोचे संस्थापक आणि संचालक अतुल गुप्ता म्हणाले की, 'आम्ही आमच्या ग्राहकांसाठी अमेरी ही स्कूटर लाँच करण्यास उत्सुक आहोत. अमेरी ही स्कूटर नाविन्यपूर्ण असून ही स्कूटर पर्यावरणपूरक आहे. तिचा प्रभावशाली वेग, अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि समृध्द डिझाइन यांमुळे या स्कूटरवरुन प्रवास करण्याचा एक वेगळाच अनुभव नागरिकांना मिळेल.' तसेच या स्कूटरमध्ये अनेक अत्याधुनिक सुविधा आहेत. त्यामुळे नागरिकांना हि स्कूटर चालवताना जास्त त्रास होणार नाही असं देखील कंपनीकडून सांगण्यात येत आहे. तसेच अनेक वैशिष्टपूर्ण फिचर्समुळे ही स्कूटर ठरावीक वयोगटीतील लोकांना चालवण्यास देखील सोपी आहे.