New Ducati Monster SP Launched: डुकाटीची नवीन बाईक लॉन्च, कावासाकी आणि ट्रायम्फ स्पोर्ट्स बाईकला देणार टक्कर!
New Ducati Monster SP: डुकाटीने आपल्या स्पोर्ट्स बाईकचे लेटेस्ट व्हर्जन लॉन्च केले आहे. डुकाटीची मॉन्स्टर एसपी ही बाईक कावासाकी ZS900 आणि ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल RS सारख्या स्पोर्ट बाईकला टक्कर देईल.
New Ducati Monster SP Sport Bike: इटालियन टू-व्हीलर कंपनी डुकाटी (Ducati)ने आपल्या टूर बाईक डुकाटी मॉन्स्टर एसपी (Ducati Monster SP)चे अपडेटेड व्हर्जन भारतात लॉन्च केले आहे. या नवीन बाईकचा लूक स्टँडर्ड मॉडेलसारखाच असेल, पण तिची उंची सर्वात वरती असेल, त्याचे कारण म्हणजे त्यात केलेले काही कॉस्मेटिक बदल. या बाईकमध्ये BS6-II मानकांसह 973 CC इंजिन तसेच 4.3 इंचाचे TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहे.
डुकाटी मॉन्स्टर एसपी बाईकचा लूक कसा असेल?
या नवीन बाईकच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर ती सध्याच्या स्टँडर्ड मॉन्स्टर बाईकसारखीच दिसते. पण या बाईकचे वजन पूर्वीच्या बाईकपेक्षा थोडे कमी आहे. याशिवाय यात मस्क्युलर फ्युएल टँक, अपसाइड ड्युअल एक्झॉस्ट सिस्टीम, गोलाकार हेडलाइट, स्टेप-अप सीटचा समावेश आहे. बाईकला एलईडी लाइटिंग सेटअप, ब्लूटूथ सपोर्टेड 4.3 इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, याशिवाय 17 इंचाच्या मिश्र धातुच्या चाकांचा (Alloy Wheels) समावेश आहे.
डुकाटी मॉन्स्टर एसपी बाईकचे इंजिन कसे असेल?
या नवीन बाईकमध्ये शक्तिशाली 937 CC चे टेस्टास्ट्रेटा L-ट्विन इंजिन आहे, जे 9,250rpm वर 109hp ची कमाल पॉवर आणि 6,500rpm वर 93Nm चा सर्वाधिक टॉर्क जनरेट करते. ही बाईक 6-स्पीड गिअरबॉक्स ट्रान्समिशनसह जोडलेली आहे. डुकाटीच्या नव्या बाईकचे वजन 186 किलोग्रॅम आहे आणि तिचा टॉप स्पीड 205 किमी/तास आहे. ही बाईक 18.8 km/l मायलेज देण्यास सक्षम आहे.
डुकाटी मॉन्स्टर एसपी बाईकचे फिचर्स
रायडरच्या उत्तम सुरक्षेसाठी या बाईकला पुढच्या आणि मागच्या दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक बसवण्यात आलेत. यासोबतच, कॉर्नरिंग अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम, व्हील कंट्रोल आणि ट्रॅक्शन कंट्रोल फिचर्ससोबतच यात स्पोर्ट, रोड आणि वेट राइडिंग मोड्स देखील दिले गेले आहे. सस्पेन्शनबद्दल बोलायचे झाले तर याला समोरील बाजूस इनव्हर्टेड फोर्क्स आणि मागील बाजूस प्रीलोड अॅडजस्टेबल मोनो-शॉक युनिट देण्यात आले आहेत.
डुकाटी मॉन्स्टर एसपीची किंमत किती? स्पर्धा कोणाशी?
देशांतर्गत बाजारात कंपनीने 15.95 लाख रुपयांच्या किमतीत नवीन डुकाटी मॉन्स्टर एसपी (Ducati Monster SP) लॉन्च केली आहे. स्पोर्ट बाईक कावासाकी ZS 900 आणि ट्रायम्फ स्ट्रीट ट्रिपल RS (Triumph Street Triple RS) सारख्या स्पोर्ट बाईकला दुकाटीची ही बाईक टक्कर देईल.
संबंधित बातम्या:
Toyota Innova Crysta: टोयोटा इनोवा क्रिस्टा VX आणि ZX मॉडेलची किंमत समोर? तुम्ही कोणती खरेदी करताय?