![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Diwali 2023: दिवाळीत खास व्यक्तीला भेटवस्तू द्यायचा विचार करताय? 'हे' आहेत 5 पर्याय
Electric Scooters: यंदाच्या दिवाळील तुमच्या प्रियजनांना गिफ्ट द्यायचा विचार करत असाल तर या 5 किफायतशीर इलेक्ट्रिक स्कूटर्स उत्तम पर्याय ठरतील.
![Diwali 2023: दिवाळीत खास व्यक्तीला भेटवस्तू द्यायचा विचार करताय? 'हे' आहेत 5 पर्याय Diwali 2023 gift ideas gift 5 affordable electric scooters to your loved ones this season Diwali 2023: दिवाळीत खास व्यक्तीला भेटवस्तू द्यायचा विचार करताय? 'हे' आहेत 5 पर्याय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/08/23abf72a5f9237cf1925eb1069aa6b561699437159087713_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Electric Scooters: सणासुदीचा काळ असताना तुम्ही तुमच्या प्रियजनांसाठी विचारपूर्वक आणि उत्तम पर्यावरणास-अनुकूल गिफ्ट्स खरेदी करणार हे नक्की. जर तुम्ही दिवाळीला तुमच्या खास व्यक्तींना काय गिफ्ट द्यायचं हा विचार करत असाल तर इलेक्ट्रिक स्कूटर्स (Electric Scooters) सर्वोत्तम पर्याय आहे. ज्यामध्ये सोयीसुविधा, शाश्वतता आणि स्टाईलचं संयोजन आहे. दिवाळीदरम्यान गिफ्ट देण्यासाठी अनुकूल असलेल्या टॉप इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि त्यांची वैशिष्टये आणि फायदे पाहूया.
1. ओडीसी ई2गो
ग्रॅफिन व्हेरिएंची किंमत: 63,650 रूपये
ओडीसी ई2गो इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये शक्तिशाली मोटर (250 वॅट), कीलेस इलेक्ट्रिक स्टार्ट सिस्टम आणि पोर्टेबल बॅटरी आहे. या स्कूटरचे व्हेरिएण्ट्स आहेत: ई2गो प्रो, ई2गो प्लस, ई2गो लाइट, ई2गो ग्रॅफिन, जे दैनंदिन प्रवासासाठी विविध रेंज आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या वापरकर्त्यांना इकोनॉमिक कॉम्पॅटिबिलिटीची व्यापक श्रेणी देतात. ई२गो मॅटे ब्लॅक, स्कारलेट रेड, टील ग्रीन, अझुरे ब्ल्यू आणि कॉम्बॅट ब्ल्यू या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. ई२गो आरामदायी व विश्वसनीय राइडचा अनुभव देते. या स्कूटरमधील लिथियम-आयन बॅटरी 4 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होते आणि तुम्ही निवडणाऱ्या व्हेरिएण्टनुसार रेंज प्रतिचार्ज 40 किमी ते 70 किमी आहे. या स्कूटरमध्ये यूएसबी चार्जिंग, अॅण्टी-थेफ्ट लॉक आणि कीलेस एण्ट्री डिजिटल स्पीडोमीटर देखील आहे. तीन वर्षांच्या वॉरंटीसह तुम्ही निश्चिन्त राइडचा आनंद घेऊ शकता.
2. अॅम्पियर मॅग्नस ईएक्स
किंमत: 73,999 रूपये
एकीकृत यूएसबी पोर्ट, एलसीडी स्क्रिन, कीलेस एण्ट्री व अॅण्टी-थेफ्ट अलार्म असलेली अॅम्पियर मॅग्नस ईएम्स वैशिष्ट्य-संपन्न इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये प्रतितास 55 किमीच्या अव्वल गतीपर्यंत पोहोचण्यासाठी 1.2 केडब्ल्यू मोटर आहे, तसेच 60 व्होल्ट, 30 एएच बॅटरी आहे, जी 5 अॅम्पियर सॉकेटच्या माध्यमातून 6 ते 7 तासांमध्ये 0 ते 100 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. मॅग्नस ईएक्समध्ये 121 किमीची प्रभावी एआरएआय-प्रमाणित रेंज आहे.
3. हिरो इलेक्ट्रिक फोटॉन एलपी
किंमत - 86,391 रूपये
हिरो इलेक्ट्रिक फोटॉन भारतात उपलब्ध असलेली इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ही स्कूटर एका व्हेरिएण्टमध्ये आणि तीन रंगांसह येते. या स्कूटरमध्ये शक्तिशाली 1200 वॅट मोटर आणि संयोजित ब्रेकिंग सिस्टमसह फ्रण्ट आणि रिअर ड्रम ब्रेक्स आहेत. फोटॉन दोन ड्राइव्ह मोड्स: पॉवर व इकॉनॉमी असलेली हाय-स्पीड स्कूटर आहे. ही स्कूटर प्रतितास 45 किमीची अव्वल गती देते. ही स्कूटर पूर्ण चार्ज असल्यास पॉवर मोडमध्ये जवळपास 50 किमीची आणि इकॉनॉमी मोडमध्ये प्रभावी 80 किमीची रेंज देते. स्कूटरमध्ये पॉलिकार्बोनेट हेडलॅम्प, फ्रण्ट टेलिस्कोपिक सस्पेंशन, फ्रण्ट डिस्क ब्रेक आणि अॅण्टी-थेफ्ट अलार्म आहे. या स्कूटरसाठी राइडर्सकडे वाहन परवाना आणि नोंदणी असणे आवश्यक आहे. फोटॉन ब्लॅक, बरगंडी व व्हाइट या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
4. ओकिनावा रिज 100
किंमत: 1,15,311 रूपये
ओकिनावा रिज 100 एक व्हेरिएण्ट आणि तीन रंगांमध्ये येते. या स्कूटरमध्ये शक्तिशाली 800 वॅट मोटर व इलेक्ट्रॉनिकली असिस्टेड ब्रेकिंग सिस्टमसह फ्रण्ट आणि रिअर ड्रम ब्रेक्स आहेत. आकर्षक डिझाइन, व्यावहारिक वैशिष्ट्ये आणि 149 किमीच्या रेंजसह रिज 100 मध्ये प्रगत वैशिष्ट्ये आहेत जसे सेंट्रल लॉकिंग, अॅण्टी-थेफ्ट सिस्टम, जिओ-फेन्सिंग, इम्मोबिलायझेशन, पार्किंग असिस्टण्स, ट्रॅकिंग व मॉनिटरिंग. ही स्कूटर जवळपास पाच ते सहा तासांमध्ये संपूर्ण चार्ज होते आणि अव्वल गती प्रतितास 50 किमी आहे.
5. ओला एस1
किंमत - 1,29,999रूपये
भारतात ओला एस1 इलेक्ट्रिक स्कूटर ओला एस1 आणि ओला एस1 प्रो या दोन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये कॉम्पॅक्ट डिझाइनसह ट्विन-पॉड हेडलाइट्स, एलईडी डीआरएल रिंग, स्लीक इंडिकेटर्स, व्यापक स्टोरेज आणि विविध रंग पर्याय आहेत. 8.5 केडब्ल्यू मोटरची शक्ती असलेल्या ओला एस1 ची अव्वल गती प्रतितास 90 किमी आहे आणि प्रतिचार्ज 121 किमीची रेंज देते. ओला एस१ प्रो ची अव्वल गती प्रतितास 115 किमी आहे आणि प्रतिचार्ज 181 किमीची रेंज देते. दोन्ही व्हेरिएण्ट्समध्ये सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत जसे रिमोट लॉक/अनलॉक, इन्फोटेन्मेंट, जीपीएस, अॅण्टी-थेफ्ट अलर्ट्स, डिस्क ब्रेक्स आणि कम्बाइन्ड ब्रेकिंग सिस्टम. एस१ प्रो मध्ये क्रूझ कंट्रोल व वॉईस असिस्ट यासारखी अतिरिक्त वैशिष्ट्ये आहेत. नुकतेच ओला इलेक्ट्रिकने एस1 ला दोन बॅटरी पर्यायांसह अपडेट केले: 91 किमी रेंज देणारी 2 केडब्ल्यूएच बॅटरी आणि 141 किमी रेंज देणारी 3 केडब्ल्यूएच बॅटरी.
यंदा दिवाळीला परिवहनाच्या शाश्वत व सोईस्कर मोडसाठी तुमच्या प्रियजनांना इलेक्ट्रिक स्कूटर गिफ्ट द्या. प्रत्येक स्कूटरमध्ये अद्वितीय वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे शहरामध्ये सहजपणे ड्रायव्हिंग करता येण्यासह कार्बनचे प्रमाण देखील कमी होते. दररोज प्रवास करायचा असो किंवा साहसी राइडचा आनंद घ्यायचा असो या इलेक्ट्रिक स्कूटर्स हरित व कार्यक्षम सुविधा देतात, ज्यामुळे दिवाळी सणाचा अधिक उत्साहपूर्ण आनंद घेता येऊ शकतो.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)