एक्स्प्लोर

चीनची 'ही' कंपनी भारतात आपली दुसरी इलेक्ट्रिक कार करणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BYD Atto3: भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे मार्केट आता जोर धरत आहे. हेच पाहता अनेक परदेशी कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात उतरवत आहे. अशातच आता चीनची कंपनीही भारतात आपली दुसरी इलेक्ट्रिक कार लॉन्च करू शकते.

BYD Atto3: भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे मार्केट आता जोर धरत आहे. हेच पाहता अनेक परदेशी कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात उतरवत आहे. अशातच आता चीनची कंपनीही भारतात आपली दुसरी इलेक्ट्रिक कार लॉन्च करू शकते. BYD India ने अलीकडेच त्यांच्या आगामी इलेक्ट्रिक SUV BYD Atto3 चा टीझर रिलीज केला आहे. E6 इलेक्ट्रिक SUV नंतर BYD Atto3 हे कंपनीचे भारतातील दुसरे इलेक्ट्रिक वाहन असेल. ही SUV भारतात लॉन्च केली जाईल की नाही, हे BYD India ने अजून उघड केलेले नाही. मात्र कंपनी भारतात आपली ही कार लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

कंपनीने जारी केलेल्या टीझरमध्ये दिसत असल्याप्रमाणे एसयूव्हीचा एलईडी डेटाइम रनिंग लाइट दिसू शकते. याशिवाय या SUV बद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. एका रिपोर्ट्सनुसार, BYD Atto3 ची किंमत 25 लाख ते 35 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. या किंमतीत Atto3 ची स्पर्धा MG ZS EV आणि Hyundai Kona EV शी होईल.

BYD Atto3 मध्ये एक सिंक्रोनस मोटर वापरली जाणार आहे. जी 204 Bhp जास्तीत जास्त पॉवर आणि 310 Nm आउटपुट तयार करते. इलेक्ट्रिक एसयूव्ही फक्त 7.3 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग पकडू शकते. जे त्याचे 1680-1750 किलो वजन लक्षात घेता चांगले आहे. याची स्पर्धक एसयूव्ही पॉवरच्या बाबतीत MG ZS EV 176 Bhp पीक पॉवर आणि 280 Nm टॉर्क बनवते. त्याच वेळी Hyundai Kona EV ची कमाल पॉवर 136 Bhp आणि टॉर्क 395 Nm आहे. BYD Atto3 दोन बॅटरी पॅक मॉडेल्समध्ये लॉन्च केली जाऊ शकते. यामध्ये 49.92 kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकमध्ये 320 किमीची रेंज आणि 420 किमीची रेंज देणारा 60.48 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक समाविष्ट असेल.

मिळालेल्या माहितीनुसार, BYD इंडिया आपली आगामी Atto3 SUV फेस्टिव्हलमध्ये लॉन्च करू शकते. कंपनी चेन्नईजवळील श्रीपेरुंबदुर येथे आपली वाहने असेंबल करते. कंपनीने पुढील दोन वर्षांत भारतात सुमारे 10,000 इलेक्ट्रिक वाहने विकण्याची आपली योजना असल्याचं जाहीर केलं आहे. BYD भविष्यात भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी देशात स्थानिक उत्पादन सुविधा स्थापन करण्याची संधी शोधण्यासाठी देखील तयार आहे. BYD इंडियाचे इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेईकल बिझनेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय गोपालकृष्णन यांच्या मते, कंपनी पुढील काही महिन्यांत लॉन्च होणार्‍या Atto3 SUV सह मुख्य प्रवाहातील भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात प्रवेश करेल. कंपनी सध्या E6 MPV ची विक्री करत आहे, जी सध्या फक्त फ्लीट ग्राहकांपुरती मर्यादित आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 4 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra News : ABP MajhaDhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
Embed widget