Skoda Slavia : स्कोडा स्लाव्हियाला सेमीकंडक्टर चिपच्या कमतरतेचा फटका, फीचर्स केले कमी
Skoda : सेमीकंडक्टर चिपच्या कमतरतेमुळे स्कोडाची स्लाव्हिया (Skoda Slavia) कारमधील काही फिचर्स कमी करण्यात येणार आहेत.
Skoda Slavia : या वर्षी फेब्रुवारीमध्ये लाँच करण्यात आलेली स्कोडाची स्लाव्हिया कार मध्यम आकाराच्या सेडानमध्ये सर्वोत्कृष्ट विक्री झालेली कार म्हणून ओळखली जाते. परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या सेमीकंडक्टर चिपच्या कमतरतेमुळे या कारमधील काही फिचर्स कमी करण्यात येणार आहेत. सध्या स्कोडा स्लाव्हिया अॅक्टिव, अॅम्बिशन, स्टाइल एनएसआर आणि स्टाईलमध्ये उपलब्ध असून यापैकी, अॅक्टिव मॉडेल 7 इंचाच्या टचस्क्रीनसह तयार आहे. तर उर्वरित मॉडेल 10 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह तयार आहेत. परंतु, सेमीकंडक्टर चिपच्या कमतरतेमुळे ग्राहकांना टॉप-स्पेक मॉडेलमध्ये आठ इंचाची छोटी स्क्रीन मिळेल.
स्कोडा इंडियाचे ब्रँड डायरेक्टर झॅक हॉलिस यांनी सांगितले की, नवीन 8 इंची टचस्क्रीन आधीच परदेशी बाजारपेठेत वापरली जात आहे आणि ग्राहकांनाही ती आवडली आहे. त्यामुळे आता ते भारतातही अपडेट होत आहे. याशिवाय कुशकच्या फीचर्सची यादीही अपडेट करण्यात आले आहे.
स्लाव्हिया कारमधील छोट्या टचस्क्रीनसोबतच आणखी एक फीचरही बदलण्यात आले आहे. यापुढे स्लाव्हियामध्ये वायरलेस चार्जिंग आणि वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay मिळणार नाही. यातील वायरलेस चार्गिंग सध्या स्टाइल एनएसआर आणि स्टाइल ट्रिम्ससह उपलब्ध आहे, तर वायरलेस Android Auto अॅम्बिशन, स्टाइल एनएसआर आणि स्टाइल ट्रिमसह उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे बेस-स्पेक अॅक्टिव्ह मॉडेलमध्ये Apple CarPlay आणि Android Auto USB-A प्रकाराद्वारे वायर्ड आहेत. स्लाव्हियाच्या टॉप स्पेक मॉडेलला पुढील आणि मागील बाजूस 2 USB-C प्रकारचे पोर्ट आहेत.
स्कोडा कारमधील हा बदल 1 जूनपासून लागू होईल. सेमीकंडक्टरच्या कमतरतेचा परिणाम स्कोडा आणि इतर कार निर्मात्यांना झाला आहे. त्यामुळे विलंब टाळण्यासाठी आणि कार ग्राहकांना लवकर उपलब्ध होण्यासाठी त्यातील काही फीचर्स कमी करण्यात आली आहेत.
महत्वाच्या बातम्या