एक्स्प्लोर

Color Changing Car : जगातील पहिली रंग बदलणारी कार, सरड्याप्रमाणे बदलते रंग, 32 रंग बदलण्याचा पर्याय; किंमत काय?

BMW Color Changing Car : BMW ने लॉस वेगास येथे आयोजित कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो 2023 (CSE 2023) मध्ये आपली 32 रंग बदलणारी इलेक्ट्रिक कार प्रदर्शित केली.

BMW i-Vision Dee Color Changing Car : सध्या मॅचिंग आऊटफिट, शूज अशी फॅशन आहे. पण जर तुम्हाला कपड्यानुसार तुमच्या गाडीचा (Car) रंगही बदलता आला तर... हे शक्य आहे. बीएमबल्यूने (BMW) रंग बदलणारी कार बनवली आहे. आघाडीची आणि प्रसिद्ध जर्मन वाहन निर्माता कंपनी बीएमबल्यूने लॉस वेगास येथे आयोजित कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो 2023 (CSE 2023) मध्ये आपली रंग बदलणारी इलेक्ट्रिक कार प्रदर्शित केली आहे. विशेष म्हणजे ही कार एक-दोन नाही तर 32 रंग बदलते. 

BMW Color Changing Car : जगातील पहिली रंग बदलणारी कार

जर्मन (German) ऑटोमोबाईल निर्माता BMW ने जगातील पहिली रंग बदलणारी इलेक्ट्रिक कार i-Vision DE सादर केली आहे. ही कार वेगवेगळे 32 रंग बदलून वापरता येते. BMW ने लॉस वेगास येथे कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो 2023 ही कार सादर केली आहे. गेल्या वर्षीही BMW ने ही कार प्रदर्शनासाठी ठेवली होती.

How Color Changing Technology Works : कारचा रंग कसा बदलतो

आय-व्हिजन डी ही BMW ची कलर बदलणारी कार आहे. कंपनीने Less is More या टॅगलाइनसह ही कार सादर केली आहे. या कारमध्ये रंग बदलण्यासाठी 240 ई-इंक पॅनल्सचा वापर करण्यात आला आहे. या पॅनल्समुळे या कारला 32 रंग बदलता येतात. या कारची रंग बदलण्याची प्रक्रिया इलेक्ट्रिक सिग्नलद्वारे नियंत्रित करण्यात आली आहे.

BMW i-Vision DEE : बीएमडब्ल्यू आय-व्हिजन डीईई पॉवर रेंज

मीडिया रिपोर्टनुसार, BMW i-Vision DEE ही कार 32 रंग बदलू शकतो तसेच पूर्ण चार्ज केल्यावर 500 ते 700 किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकतो. ही कार चार्ज करण्यासाठी फास्ट चार्जरचा वापर केला जाऊ शकतो. यामुळे कार कमी वेळेत जास्त चार्ज होऊ शकते.

BMW i-Vision DI चे फिचर्स

या रंग बदलणाऱ्या इलेक्ट्रिक कारमध्ये फुल टच स्क्रीन डॅशबोर्ड, हाय-टेक फिचर्ससह प्रशस्त लक्झरी केबिन आहे. याशिवाय मोठ्या आकाराचे हेड अप डिस्प्ले, 16-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, एआय, व्हॉईस कमांड्स यांसारखे आधुनिक आणि प्रगत फिचर्स या कारमध्ये आहेत.

BMW i-Vision DEE : बीएमडब्ल्यू आय-व्हिजन डीईई किंमत

या कारची किंमत आणि लॉन्चिंगबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, BMW आपली टेक्नॉलॉजी कार 2025 पर्यंत बाजारात आणू शकते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget