Bike : Harley-Davidson 440X की Triumph Speed 400 तुमच्यासाठी कोणती बाईक सर्वात बेस्ट? वाचा सविस्तर माहिती
Triumph Speed 400 vs Harley-Davidson X440 : दुचाकी उत्पादक कंपनी Harley-Davidson ने आपली नवीन X440 बाईक भारतात लॉन्च केली आहे.
Triumph Speed 400 vs Harley-Davidson X440 : दुचाकी उत्पादक कंपनी Harley-Davidson ने आपली नवीन X440 बाईक भारतात लॉन्च केली आहे. हार्लेने हिरो मोटोकॉर्पच्या सहकार्याने ही बाईक बनवली आहे. या बाईकला टक्कर देण्यासाठी ब्रिटीश प्रीमियम बाईक निर्माता ट्रायम्फने आपली नवीन स्पीड 400 बाईक लॉन्च केली आहे.
जर तुम्ही यापैकी एक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कोणती बाईक तुमच्यासाठी चांगली याची तुलना करून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
दोन्ही बाईकचा रेट्रो लूक
ट्रायम्फ स्पीड 400 हायब्रिड स्पाइन/पेरिमीटर फ्रेमवर तयार केले आहे. यात फ्युएल टँकसह एलईडी हेडलाईट्स आणि टेललाईट्स देण्यात आल्या आहेत. यात यूएसबी चार्जिंग पोर्ट, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि मेटझेलर स्पोर्टेक टायर्ससह 17-इंच चाके आहेत. तर, Harley Davidson X440 चा निओ-रेट्रो लूक आहे. यामध्ये फ्युएल टँक, एलईडी हेडलॅम्प्स, राउंड साइड मिरर, मोठा हँडलबार, सिंगल-पीस स्टेप-अप सीट, साईड-माउंट डबल-बॅरल एक्झॉस्ट सिस्टम आणि एलईडी टेललॅम्पसह नवीन लूक दिला आहे.
इंजिन कोणत्या बाईकचं बेस्ट आहे?
Harley-Davidson X440 मध्ये 440cc सिंगल-सिलेंडर, ऑइल-कूल्ड इंजिन आहे. यामध्ये जास्तीत जास्त 27hp पॉवर आणि 38Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ट्रान्समिशनसाठी या इंजिनला 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. तर, ट्रायम्फ स्पीड 400 हे TR-सिरीजमधील 398cc लिक्विड-कूल्ड DOHC इंजिनवर आधारित आहे. हे इंजिन 8000rpm वर 40hp पॉवर आणि 6500rpm वर 37.5Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ट्रान्समिशनसाठी यामध्ये 6-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.
फिचर्स कसे आहेत?
रायडरची सुरक्षितता लक्षात घेऊन, Harley-Davidson X440 आणि Triumph Speed 400 ला ड्युअल-चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) सह दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक मिळतात. स्पीड 400 मध्ये ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आणि राईड-बाय-वायर थ्रॉटल सारखी नवीन वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत. तर, Triumph Speed 400 ला टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स मिळतात. दोन्ही निओ-रेट्रो बाईकला प्रीलोड-अॅडजस्टेबल रिअर मोनो-शॉक युनिट देखील देण्यात आला आहे.
कोणती बाईक चांगली?
भारतातील Harley-Davidson X440 ची किंमत 2.29 लाख आहे. तर, ट्रायम्फ स्पीड 400 ची किंमत 2.33 लाख रुपये (एक्स-शोरूम किंमत) आहे. मात्र, पहिल्या 10,000 ग्राहकांसाठी या बाईकची किंमत 2.23 लाख रुपये आहे. Harley-Davidson X440 ही एक भक्कम उत्तम बाईक आहे. पण अधिक पॉवरफुल इंजिन आणि उत्तम लूकमुळे ट्रायम्फ स्पीड 400 अधिक श्रेष्ठ करते.