एक्स्प्लोर

Tata Kaziranga Special Edition : टाटा पंच, नेक्सन, हॅरियर आणि सफारी काझीरंगा फर्स्ट लुक; जाणून घ्या यांच्या किंमती आणि फीचर्स...

Tata Kaziranga Special Edition :  देशातील प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने आपली काझीरंगा एसयूव्ही रेंज लॉन्च केली आहे.

Tata Kaziranga Special Edition :  देशातील प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने आपली काझीरंगा एसयूव्ही रेंज लॉन्च केली आहे. . काझीरंगा हे नाव आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाशी संबंधित आहे. या स्पेशल एडिशन गाड्या शिंग असलेल्या गेंड्यांपासून प्रेरित आहेत. पियानो ब्लॅक फिनिशमध्ये ड्युअल टोन रूफसह नवीन ग्रासलँड बेज बॉडी कलर या कारसाठी विशेष म्हणून देण्यात आला आहे. हा रंग या एडिशनच्या सर्व एसयूव्हीवर (SUV) उपलब्ध असेल. उदाहरणार्थ क्रोमसह मानक सफारीच्या तुलनेत जेव्हा काळा एलिमेंट प्रदर्शित केला जातो तेव्हा हा रंग चांगला दिसतो. या कारसह वेगवेगळ्या अ‍ॅक्सेसरीज देखील देण्यात आल्या आहेत. तसेच या कारसह कस्टम मेड्स चाव्या देखील देण्यात आल्या आहेत.     

टाटा पंच (Tata Punch)

कंपनीने लॉन्च केलेल्या काझीरंगा टाटा पंच बद्दल बोलायचे झाले तर, यात आता अर्थी बेज लेदरेट अपहोल्स्ट्री, पियानो ब्लॅक डोअर ट्रिम, अर्थी बेज ट्राय-एरो फिनिश डॅशबोर्ड मिड पॅड, ग्रॅनाइट ब्लॅक रूफ रेल, पियानो ब्लॅक ह्युमॅनिटी लाइन फ्रंट ग्रिल आणि जेट ब्लॅक 16-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहे. हा काझीरंगा एडिशन पर्सोना क्रिएटिव्ह एमटी, क्रिएटिव्ह एमटी-आयआरए, क्रिएटिव्ह एएमटी आणि क्रिएटिव्ह एएमटी-आयआरए सारख्या टॉप-एंड एडिशनशी सुसंगत असेल.

नेक्सन (Nexon)

ग्रासलँड बेज कलर व्हेरियंटसह नेक्सन काझीरंगा एडिशनला ड्युअल टोन अर्थी बेज लेदरेट अपहोल्स्ट्री, पियानो ब्लॅक डोअर ट्रिम अॅडिशन्स, एक्सक्लुझिव्ह वुड फिनिश डॅशबोर्ड मिनी-पॅड्स, ग्रॅनाइट ब्लॅक बॉडी क्लेडिंग्स आणि रूफ रेल, पियानो ब्लॅक ह्युमॅनिटी लाइन फ्रंट ग्रिल आणि जेट ब्लॅक 16 इंच अलॉय व्हील्स देखील देण्यात आले आहे. यासोबतच यात एअर प्युरिफायर आणि नवीन इलेक्ट्रो-क्रोमॅटिक IRVM देखील देण्यात आले आहेत. ग्राहक Nexon XZ+ आणि Nexon XZA+ व्हेरियंटमध्ये हे स्पेशल एडिशन Nexon घेऊ शकता. यात महत्वाचे म्हणजे हे स्पेशल एडिशन Nexon पेट्रोल / डिझेलसाठी आहे. हे स्पेशल एडिशन इलेक्ट्रिकमध्ये उपलब्ध नाही.  

हॅरियर आणि सफारी (Harrier & Safari) 

हॅरियर आणि सफारी दोघांनाही खास रंग, ड्युअल टोनच्या अर्थीच्या बेज लेदरेट सीट, डोर ट्रिम्स, ट्रॉपिकल वूड फिनिश डॅशबोर्ड मिड-पॅड, ग्रॅनाइट ब्लॅक बॉडी क्लेडिंग्स, पियानो ब्लॅक इन्सर्टसह ग्रॅनाइट ब्लॅक फ्रंट ग्रिल आणि हॅरियरमध्ये जेट ब्लॅक 17-इंच अलॉय व्हील मिळणार, तर सफारीत 18 इंच अलॉय व्हील मिळणार. याशिवाय सफारीमध्ये वायरलेस चार्जर, अॅपल कारप्ले / वाय-फायवर अँड्रॉइड ऑटो, एअर प्युरिफायर, कनेक्टेड टेक सारखे फीचर्स देखील ग्राहकांना मिळणार आहे.  

मॉडेल आणि किंमत 
 
महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Embed widget