एक्स्प्लोर

Tata Altroz Facelift Launch : Tata Altroz Facelift लवकरच लाँच होणार; Advance फिचर्स कोणते असतील?

Tata Altroz Facelift Launch : टाटा मोटर्सने अल्ट्रोज आणि पंच मॉडेलचे फेसलिफ्ट मॉडेलने 2024 आणि 2025 मध्ये लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने अल्ट्रोज फेसलिफ्टची टेस्टिंग सुरू केली आहे

Tata Altroz Facelift Launch : टाटा मोटर्सने(Tata) अल्ट्रोज  आणि पंच मॉडेलचे फेसलिफ्ट (Auto News) मॉडेलने 2024 आणि 2025 मध्ये लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने अल्ट्रोज फेसलिफ्टची टेस्टिंग सुरू केली असून नुकतेच त्याने स्पाय शॉट्सही समोर आले आहेत. ज्यामुळे डिझाईन डिटेल्सची फारशी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या कारमध्ये अनेक बदल करण्यात आले असल्याचं सांगण्यात आलं आहे. इंटेरियरमध्ये आणि इक्सटेरियरमध्येदेखील काही प्रमाणात बदल होणार का हे पण पाहणं महत्वाचं आहे. 

काय बदलणार?

याचे इक्सटेरियर बऱ्याच अंशी सध्याच्या मॉडेलसारखेच असण्याची शक्यता आहे. तर इंटिरिअरमध्ये अनेक मोठे अपग्रेड मिळण्याची शक्यता आहे. नव्या अल्ट्रोजमध्ये डॅशबोर्डच्या मध्यभागी मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम मिळणार आहे. या अपडेटेड हॅचबॅकमध्ये 7.0 इंच डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, एअर प्युरिफायर आणि 6 एअरबॅग्जसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

टाटा अल्ट्रोज फेसलिफ्ट पॉवरट्रेन

2024 टाटा अल्ट्रोज फेसलिफ्टमध्ये पॉवरट्रेनमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. यात 1.2 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन अनुक्रमे 88 बीएचपी आणि 110 बीएचपी जनरेट करते. या हॅचबॅकमध्ये सीएनजी पॉवरट्रेन देखील असेल, ज्यात टाटाच्या ट्विन सिलिंडर सीएनजी तंत्रज्ञानासह 1.2 लीटर पेट्रोल इंजिन मिळेल. 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड डीसीटी सह ट्रान्समिशन पर्याय सध्याच्या मॉडेलसारखेच राहतील. 

टाटा अल्ट्रोज रेसर 

अल्ट्रोज फेसलिफ्ट लाँच केल्यानंतर टाटा मोटर्स गेल्या वर्षी ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आलेली अल्ट्रोज रेसर लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही हॅचबॅक स्पोर्टी आणि पॉवरफुल व्हेरियंट म्हणून लाँच करण्यात येणार आहे. अल्ट्रोज रेसरची अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. यात 120 बीएचपी, 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन किंवा टाटाचे नवीन 125 बीएचपी, 1.2 एल डायरेक्ट इंजेक्शन टर्बो पेट्रोल इंजिन असू शकते जे टाटा कर्व्ह कूप एसयूव्हीसाठी वापरले जाईल.

टाटा कर्व्ह एसयूव्ही डिझेल इंजिनसह येण्याची शक्यता

टाटा कर्व्ह कॉन्सेप्ट बेस्ड कूप एसयूव्ही ही या वर्षी लाँच होणाऱ्या नव्या कारपैकी एक आहे. टाटा मोटर्सने अधिकृतरित्या माहिती दिली आहे की हे मॉडेल सुरुवातीला इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह सादर केले जाईल आणि त्यानंतर त्याचे आयसीई व्हर्जन लाँच केले जाईल. कर्व्ह ईव्हीचे प्रॉडक्शन एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते आणि 2024 च्या शेवटपर्यंत बाजारात लाँच केले जाईल. या इलेक्ट्रिक कूप एसयूव्हीची निर्मिती पुण्याजवळील रांजणगाव येथील टाटाच्या कारखान्यात केली जाईल.

इतर महत्वाची बातमी-

Honda Adventure Bike: Honda CB 350 ची नवी अॅडव्हेंचर बाईक डिझाइन लीक; कधी होणार लाँच ?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Embed widget