Mahindra Scorpio N : महिंद्राच्या Scorpio N Z8 ट्रिममध्ये नवीन व्हेरिएंटचा समावेश; कमीत कमी किंमतीत मिळतील जास्तीत जास्त फीचर्स
Mahindra Scorpio N Z8 Select Launched : Scorpio N Z8 सिलेक्ट व्हेरियंटच्या पेट्रोल मॅन्युअलची किंमत 16.9 लाख रुपये आहे, तर ऑटोमॅटिकची किंमत 18.4 लाख रुपये आहे.
Mahindra Scorpio N Z8 Select Launched : दिग्गज कार निर्माता कंपनी महिंद्राने Scorpio N (Mahindra Scorpio N) लाईनअपमध्ये Z8 सिलेक्ट व्हेरियंटसह एक नवीन व्हेरिएंट जोडला आहे. यामुळे Z8 रेंज अधिक परवडणारी आहे. यांसह, Z8 रेंजची एक्स-शोरूम किंमत आता 16.9 लाख रुपयांपासून सुरू होते. Z8 सिलेक्ट व्हेरियंट 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिकसह डिझेल आणि पेट्रोल ऑप्शनसह येतो.
फीचर्स काय असतील? (Mahindra Scorpio N Z8 Features)
Scorpio N Z8 Select या कारच्या व्हेरिएंटमध्ये Adrenox Connect, इंटर्नल अलेक्सा, ड्युअल बॅरल एलईडी हेडलॅम्प, LED प्रोजेक्टर फॉग्लॅम्प्स आणि LED DRLs, R17 डायमंड कट अलॉय व्हील्स, कॉफी-ब्लॅक लेथरेट इंटीरियर आणि इतर अनेक फीचर्सचा समावेश आहे. Z8 सिलेक्टमध्ये एक नवीन मिडनाईट ब्लॅक कलर देखील समाविष्ट केला आहे. त्याचबरोबर एलईडी डेटाईम रनिंग लॅम्प्स, एलईडी प्रोजेक्टर फॉग लॅम्प्स आणि ORVM वर एलईडी सिक्वेंशियल टर्न इंडिकेटर, 8-इंच इंफोटेनमेंट स्क्रीन आणि 17.78 सेमी कलर TFT क्लस्टर, इंटर्नल अलेक्सा, सनरूफ आणि वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सारखी फीचर्स देण्यात आलेले आहेत.
कारची किंमत किती? (Mahindra Scorpio N Z8 Price)
Scorpio N Z8 सिलेक्ट व्हेरियंटच्या पेट्रोल मॅन्युअलची किंमत 16.9 लाख रुपये आहे, तर ऑटोमॅटिकची किंमत 18.4 लाख रुपये आहे. तसेच, डिझेल Z8 सिलेक्ट रेंजच्या डिझेल मॅन्युअलची किंमत 17.9 लाख रुपये आणि डिझेल ऑटोमॅटिकची किंमत 18.9 लाख रुपये आहे. हा नवीन व्हेरिएंट Z8 आणि Z8L च्या खाली लाइनअपमध्ये ठेवला आहे. महिंद्राच्या (Mahindra Car) या कारमध्ये कमीत कमी किंमतीत जास्ती जास्त फीचर्स देण्याचा कंपनीचा हेतू आहे.
कॉम्पॅक्ट एसयूव्ही ग्राहक लक्ष्य असतील
स्कॉर्पिओ एन (Scorpio N) भारतीय बाजारपेठेत अत्यंत यशस्वी ठरली आहे आणि अलीकडच्या काळात या किमतीच्या रेंजमध्ये लॉन्च केलेल्या नवीन एसयूव्हीशी स्पर्धा करण्यासाठी, महिंद्राला आता स्कॉर्पिओ एन अधिक आकर्षक बनवायचे आहे तसेच कॉम्पॅक्ट एसयूव्ही खरेदीदारांसाठी देखील पर्याय बनवायचा आहे. हाय एंड Z8 व्हेरियंटच्या तुलनेत, नवीन व्हेरियंटमध्ये ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि पुश बटण स्टार्ट/स्टॉप हे फिचर्स जोडण्यात आलेले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या :