(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Auto News : बहुप्रतिक्षीत BYD Seal EV 'या' दिवशी भारतात होणार लॉन्च; वाचा या कारचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
Auto News : 150kW चार्जरसह BYD सील 10 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी सुमारे 37 मिनिटे लागतील.
Auto News : दिग्गज कार उत्पादक कंपनी BYD भारतात आपलं तिसरं मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. नवीन लॉन्च होणारं हे मॉडेल इतकं आकर्षक आहे की, ग्राहकांनी या कारसाठी बुकिंगही सुरू केली आहे. बीवायडीच्या या मॉडेलबाबत भारतीय बाजारपेठेत मोठी क्रेझ आहे. BYD चे नवीन मॉडेल BYD Seal 5 मार्च रोजी म्हजेच उद्या भारतात लॉन्च होणार आहे. 2023 मध्ये झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये BYD सील पहिल्यांदा उघड झाली. आता ती भारतात लॉन्च होण्याच्या तयारीत आहे.
बीवायडी सीलची वैशिष्ट्ये (BYD Seal EV Features)
BYD Seal EV भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे. ऑटोकार इंडियाच्या रिपोर्टनुसार, या कारमध्ये 82.5 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक जोडण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, मागील एक्सलमध्ये 230hp/360Nm चुंबक सिंक्रोनस मोटर देखील जोडली गेली आहे. ही कार एका चार्जिंगमध्ये 570 किलोमीटर अंतर कापण्यास सक्षम असणार आहे. तसेच, हे वाहन 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी फक्त 5.9 सेकंद घेईल.
150kW चार्जरसह BYD सील 10 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी सुमारे 37 मिनिटे लागतील. त्याच वेळी, नियमित 11kW AC चार्जरसह बॅटरी 0 ते 100 टक्के मिळविण्यासाठी 8.6 तास लागू शकतात.
BYD सील एक्स-शोरूम किंमत किती? (BYD Seal EV Price)
BYD सील 50 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीसह भारतात उतरण्यासाठी सज्ज आहे. BYD Seal EV चे दोन मॉडेल्स भारतात आधीच आले आहेत. त्याच्या पहिल्या दोन मॉडेल्सची नावे BYD e6 electric MPV आणि BYD Atto 3 electric SUV आहेत. BYD e6 इलेक्ट्रिक MPV ची एक्स-शोरूम किंमत 29.15 लाख रुपये आहे. तर BYD Atto 3 इलेक्ट्रिक SUV ची एक्स-शोरूम किंमत 33.99 लाख रुपये आहे.
BYD सील डिझाईन कसं आहे?
BYD Seal EV ची रचना फारच आकर्षक आहे. या कारमध्ये कूपसारखे सर्व-काचेचे छप्पर, फ्लश फिटिंग डोअरचे हँडल, स्प्लिट हेडलॅम्प डिझाईन आणि चार बूमरँग-आकाराचे एलईडी डेटाईम रनिंग लाईट्स देखील आहेत. ग्राहकांना या करचा लूक फारच आवडू शकतो.
कोणत्या कारशी स्पर्धा करणार?
या कारची थेट स्पर्धा Hyundai Ioniq 5 शी होणार आहे. या Hyundai कारची किंमत 46.05 लाख रुपये आहे.