जबरदस्त लूक आणि फीचर्सही दमदार, Aston Martin ने DBS 770 Ultimate केली अपग्रेड
Aston Martin DBS 770 Ultimate: Aston Martin ने आपली नवीन DBS 770 Ultimate ही फ्युचरिस्टिक स्पोर्ट्सकार म्हणून डिझाइन केली आहे.
Aston Martin DBS 770 Ultimate: Aston Martin ने आपली नवीन DBS 770 Ultimate ही फ्युचरिस्टिक स्पोर्ट्सकार म्हणून डिझाइन केली आहे. कंपनीने आता या कारला एक नवीन आकर्षक लूक दिला आहे. या अपग्रेड अंतर्गत Aston Martin DBS 770 Ultimate चे फक्त 300 कूप आणि 199 Convertible उपलब्ध असतील. त्यापैकी सर्व गाड्यांचे बुकिंग आधीच झाली असून याची उन्हाळ्याच्या अखेरीस डिलिव्हरी सुरू होईल.
Aston Martin DBS 770 Ultimate: इंजिन अपग्रेड
नवीन DBS 770 Ultimate कंपनीच्या आतापर्यंतच्या सर्वात पॉवरफुल 5.2-लीटर, क्वाड-कॅम V12 इंजिनद्वारे समर्थित आहे. ज्यामध्ये 769hp ची पॉवर आणि 900 Nm चा टॉर्क फक्त 1,800 rpm वर उपलब्ध आहे. 8-स्पीड ZF गिअरबॉक्स देखील फास्ट शिफ्ट्स ऑफर करण्यासाठी पुन्हा बदलण्यात आला आहे. ही कार फक्त 3.2 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते. याचा वेग 340 किमी प्रतितास इतका आहे.
Aston Martin DBS 770 Ultimate: मेकॅनिकल अपग्रेड
Aston Martin DBS 770 जी गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आली होती, ती V12 इंजिनसह येते. यात मोठ्या प्रमाणात पॉवर आणि एक स्ट्रॉंग ड्राईव्हट्रेन आणि हाताळण्यास सोपी असलेल्या मोठ्या चेसिससह मिळते. कारला चारही कोपऱ्यांवर नव्याने डिझाइन केलेले अॅडॉप्टिव्ह डॅम्पर्स तसेच डेंटिंग रोलिंग रिफाइनमेंट्सच्या चांगल्या नियंत्रणासाठी नवीन सॉलिड-माउंट स्टीयरिंग कॉलम देखील मिळतो, जे ड्रायव्हिंगचा चांगला अनुभव देण्यास मदत करते.
Aston Martin DBS 770 Ultimate: आतील आणि बाहेरील अपडेट
अपडेटेड Aston Martin DBX 707 ला सध्याच्या DBS च्या तुलनेत एक आक्रमक डिझाईन मेकओव्हर मिळतो, जो खूपच वेगळा दिसतो. याला हॉर्सशू-आकाराचे बोनेट व्हेंट्स देखील मिळतात, जे इंजिन कूलिंग करण्यास मदत करतात. या सोबतच नवीन डिझाइन केलेले स्प्लिटर, तसेच मोठ्या नवीन एअर व्हेंट्स सोबत पुढच्या बाजूस डाऊनफोर्स, ज्यामुळे हवेचा प्रवाह वाढतो. इतर महत्त्वाच्या बदलांमध्ये कार्बनफायबर बॉडी एलिमेंट अधिक दिसतो. यात नवीन 21-इंच व्हीलचा देखील समावेश आहे. याच्या आतिल भागात कमी बदल करण्यात आले आहेत. मात्र बाहेरील बाजूस आपल्याला बरेच बदल ज्याचं दिसतं. DBS 770 Ultimate वरील बॅजिंग देखील या कारला अधिक आकर्षक बनवते.
इतर महत्वाची बातमी: