Thane Electric Bus: मुंबईनंतर आता ठाण्यातही धावणार इलेक्ट्रिक बस, पालिकेने दिली 123 ईव्हीची ऑर्डर
Thane Electric Bus: देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. तसेच या वाहनांना लोकांची मोठ्या प्रमाणात पसंतीही मिळत आहे.
![Thane Electric Bus: मुंबईनंतर आता ठाण्यातही धावणार इलेक्ट्रिक बस, पालिकेने दिली 123 ईव्हीची ऑर्डर After Mumbai, now this electric bus will run in Thane, the municipality has placed an order for 123 EVs Thane Electric Bus: मुंबईनंतर आता ठाण्यातही धावणार इलेक्ट्रिक बस, पालिकेने दिली 123 ईव्हीची ऑर्डर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/22/df880499018acda183d12918f6e9a406_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Thane Electric Bus: देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. तसेच या वाहनांना लोकांची मोठ्या प्रमाणात पसंतीही मिळत आहे. अशातच आता अनेक राज्यात सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यात येत आहे. यातच मुंबई महापालिकेनंतर ठाणे महापालिकेनेही आपल्या बसच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिकेने ऑलेक्ट्रा (Olectra Greentech) कंपनीला इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर दिली आहे. ऑलेक्ट्राला ठाणे महापालिकेकडून 185 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे.
राज्य प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांवर भर देत आहे. ऑलेक्ट्रा कंपनी महाराष्ट्रावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. Olectra Greentech Limited आणि Eway Trans Private Limited (EVEY) च्या कंसोर्टियमला ठाणे महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून ही ऑर्डर देण्यात आहे.
ठाणे महापालिकेने ऑलेक्ट्रा कंपनीला 123 ई-बसची ऑर्डर दिली आहे. या बसेस 9 महिन्यांत डिलिव्हरी केल्या जातील. या बसेसमध्ये 55 (45 वातानुकूलित आणि 10 नॉन एसी) 12 मीटर बसेस आहेत. आणखी 68 ई-बस (26 वातानुकूलित, 42 नॉन-एसी) -9 मीटरच्या आहेत. 12-मीटरच्या बसेसची रेंज 200 किमी असेल आणि त्यांची आसनक्षमता चालकसह 39 प्रवाशांची असेल. 9 मीटर बसेसची रेंज 160 किमी असेल आणि चालकासह 31 पेक्षा जास्त लोक या बसमध्ये बसू शकतील. लिथियम आयन बॅटरी असलेल्या या बस चार तासांत पूर्ण चार्ज होऊ शकतात.
याबाबत बोलताना ऑलेक्ट्रा कंपनीचे अध्यक्ष के व्ही प्रदीप म्हणाले की, “महाराष्ट्र राज्याकडून आणखी एक ऑर्डर मिळाल्याने आम्हाला आनंद होत आहे. यासह आमची उपस्थिती आणखी एका शहरात ठाण्यात वाढली आहे. आम्ही आधीच पुण्यात इलेक्ट्रिक बस चालवत आहोत, मुंबई आणि नागपूरमध्येही काम सुरू आहे.''
दरम्यान, मुंबई पालिकेने मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक बसची ऑर्डर दिली आहे. अलीकडेच महापालिकेच्या ताफ्यात डबल डेकर इलेक्ट्रिक बसचा समावेश करण्यात आला. तर आता मुंबई, ठाणे, पुणे नागरपूर आणि औरंगाबादच्या रस्त्यांवर सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रिक बस धावताना दिसणार आहे. तसेच एसटीच्या ताफ्यातही 1 जून 2022 रोजी 'शिवाई' या इलेक्ट्रिक बसचा समावेश करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)