ABP Live Auto Awards 2022: हॅचबॅक ते प्रीमियम, 'या' आहेत 2022 मधील सर्वात बेस्ट कार; पाहा विजेत्यांची संपूर्ण लिस्ट
ABP Live Auto Awards 2022: देशातील सर्वात प्रतिष्ठित मीडिया नेटवर्क 'एबीपी नेटवर्क'ने (ABP Network) एबीपी लाईव्ह ऑटो अवॉर्ड्सचे (ABP Live Auto Awards 2022) आयोजन केले होते. या अंतर्गत विविध श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट कार आणि बाईक्सची निवड करण्यात आली.
ABP Live Auto Awards 2022: देशातील सर्वात प्रतिष्ठित मीडिया नेटवर्क 'एबीपी नेटवर्क'ने (ABP Network) 'एबीपी लाईव्ह ऑटो अवॉर्ड्स'चे (ABP Live Auto Awards 2022) आयोजन केले होते. या अंतर्गत विविध श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट कार आणि बाईक्सची निवड करण्यात आली. कार आणि बाईक निवडताना ऑटोमोटिव्ह आयडियाज आणि त्यांची वैशिष्ट्ये यांची काळजी घेण्यात आली आहे. या कार आणि बाईक्सवरून ग्राहकांना त्यांच्यासाठी कोणती कार योग्य आहे, याची कल्पनाही येईल. या पुरस्कारामध्ये एंट्री लेव्हल कार ऑफ द इयर, हॅचबॅक ऑफ द इयर, सेडान ऑफ द इयर, फन कार, प्रीमियम एसयूव्ही ऑफ द इयर अशा अनेक श्रेणींमध्ये कार आणि बाईक्सची निवड करण्यात आली आहे. हा कार्यक्रम आयसीएटी कन्व्हेन्शन सेंटर, मानेसर येथे पार पडला. तसेच हा कार्यक्रम काल (20 डिसेंबर 2022, मंगळवार) abplive.com आणि ABP LIVE + ऑटो लाईव्ह सोशल मीडिया हँडल आणि YouTube प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपित करण्यात आला.
ऑडी (Audi) आणि पीएस (PS) समुहासोबत केलेल्या एबीपी लाईव्ह ऑटो अवॉर्ड्सने संपूर्ण ऑटोमोटिव्ह उद्योगाला एकत्र आणले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा गौरव केला आहे. बाईक्स आणि लक्झरी कार अशा 15 श्रेणींमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात कार्यक्षमता, कार्यप्रदर्शन, मूल्य, डिझाईन आणि व्यावहारिकता यांसारख्या विविध आवश्यक बाबींच्या आधारे त्यांचे मूल्यांकन करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात उद्योगातील अपवादात्मक नवकल्पनांचा गौरव करण्यात आला.
एबीपी लाईव्ह ऑटो अवॉर्ड्समध्ये कार ऑफ द इयर पुरस्कार ह्युंदाई टक्सनला (Hyundai Tucson) मिळाला, तर मारुती ग्रँड विटारा (Maruti Grand Vitara) 'एसयूव्ही ऑफ द इयर 2022' विजेतेपदासाठी पात्र ठरली. व्हीडब्लू वर्टसने 'सेडान ऑफ द इयर 2022' पुरस्कार जिंकला, Citroen C3 ला 'हॅचबॅक ऑफ द इयर 2022' हा पुरस्कार देण्यात आला आणि आलिशान लँड रोव्हर रेंज रोव्हरला 'वर्ष 2022 ची लक्झरी कार' म्हणून पुरस्कार देण्यात आला.
कोणत्या कार आणि बाईकला मिळाला पुरस्कार?
- Citroen C3: हॅचबॅक ऑफ द इयर
- VW Vitrus: सेडान ऑफ द इयर
- Maruti Grand Vitara: एसयूव्ही ऑफ द इयर
- Hyundai Tucson: प्रीमियम एसयूव्ही वर्षातील ऑफ द इयर
- Jeep Grand Cherokee: प्रीमियम लक्झरी एसयूव्ही ऑफ द इयर
- Jeep Meridian: ऑफ-रोडर ऑफ द इयर
- Land Rover Range Rover: लक्झरी कार ऑफ द इयर
- Mercedes EQS 580 4MATIC: ईव्ही ऑफ द इयर
- Ferrari 296 GTB: परफॉर्मन्स कार ऑफ द इयर
- Hyundai Tucson: कार ऑफ द इयर
- Maruti Alto K10: एंट्री-लेव्हल कार ऑफ द इयर
- Maruti Brezza: कॉम्पॅक्ट एसयूव्ही ऑफ द इयर
- Hyundai Venue N-Line: फन-टू-ड्राइव्ह कार ऑफ द इयर
- Bajaj Pulsar N160: बेस्ट बाईक ऑफ द इयर
- Suzuki Katana: प्रीमियम बाईक ऑफ द इयर
एबीपी नेटवर्कचे मुख्य डिजिटल हेड विजय जंग थापा, ''एबीपी नेटवर्कने सुरू केलेल्या या पुरस्काराला मिळालेल्या पाठिंब्यामुळे, त्याच्या यशामुळे आम्ही आनंदी आहोत. आमचे दर्शक आणि उद्योग व्यावसायिकांच्या प्रचंड पाठिंब्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत. सर्व पुरस्कार विजेत्यांचे आणि सहभागींना त्यांच्या कठोर परिश्रमाबद्दल मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. भारतात ऑटोमोटिव्ह उद्योगाला पुढे नेण्यासाठी आम्ही नेहमीच वचनबद्ध आहोत. यामध्ये नवनवीन कल्पना, उत्कृष्ट अभियांत्रिकी कौशल्य आणि इतर गोष्टींवर प्रकाश टाकायला हवं. सर्व ऑटो प्रेमींसाठी एबीपी नेटवर्क एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म, ऑटो लाईव्ह घेऊन आले आहे. यामध्ये ऑटोमोबाईल्सशी संबंधित सर्व बातम्या, रिव्ह्यू आणि त्याचे अपडेट्स याची सविस्तर माहिती असेल. त्याला ऑटो लाईव्ह चॅनेलचा अॅक्सेस असेल.''