![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Tata Tigor EV : एका चार्जमध्ये गाठता येणार मुंबई-पुणे-मुंबई; टाटाची टिगोर इलेक्ट्रिक अवतारात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2022 Tata Tigor EV launched in India: भारताच्या इलेक्ट्रिक कार बाजारात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या टाटा मोटर्सने आपली आणखी एक ईव्ही लॉन्च केली आहे.
![Tata Tigor EV : एका चार्जमध्ये गाठता येणार मुंबई-पुणे-मुंबई; टाटाची टिगोर इलेक्ट्रिक अवतारात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स 2022 Tata Tigor EV launched in India tata tigor ev price tata tigor ev features and range Auto News in Marathi Tata Tigor EV : एका चार्जमध्ये गाठता येणार मुंबई-पुणे-मुंबई; टाटाची टिगोर इलेक्ट्रिक अवतारात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/23/8c52039f66ce760f45b3624617b32b141669196753417384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
2022 Tata Tigor EV launched in India: भारताच्या इलेक्ट्रिक कार बाजारात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या टाटा मोटर्सने आपली आणखी एक ईव्ही लॉन्च केली आहे. या कारचं नाव आहे Tata Tigor. कंपनीने आपल्या या अपडेटेड सेडान ईव्हीमध्ये काही नवीन फीचर्स दिले आहेत. यासोबतच कंपनीची नवीन कार आता नवीन मॅग्नेटिक रेड कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. कंपनीने भारतीय बाजारात याची प्रारंभिक किंमत 12.49 लाख (एक्स-शोरूम) रुपये इतकी ठेवली आहे. एकदा ही कार फुल चार्ज केल्यावर 315 किमी (ARAI प्रमाणित) रेंज देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. याच कारबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
नवीन टिगोर ईव्हीमध्ये ग्राहकांना लेदरेट अपहोल्स्ट्री, लेदर रॅप्ड स्टीयरिंग व्हील, रेन सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलॅम्प आणि क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्स मिळणार आहेत. यासोबतच यात मल्टी-मोड रीजेन, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी – Z कनेक्ट, स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी, ITPMS आणि टायर पंक्चर रिपेअर किट यासारखे स्मार्ट फीचर्स ग्राहकांना यामध्ये मिळणार आहेत.
नवीन टिगोर EV व्हेरिएंट आणि किंमती (सर्व किंमती एक्स-शोरूम)
कंपनीने ही कार चार व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली आहे. यामध्ये Tigor EV XE व्हेरिएंटची किंमत 12,49,000 रुपये आहे. Tigor EV XT व्हेरिएंटची किंमत12,99,000 रुपये, EV XZ+ व्हेरिएंटची किंमत 13,49,000 रुपये आणि EV XZ+Lux व्हेरिएंटची किंमत 13,75,000 रुपये कंपनीने ठेवली आहे.
Tigor EV 55 kW पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करते आणि 26-kW लिक्विड-कूल्ड, हाय एनर्जी डेन्सिटी बॅटरी पॅक देण्यात आला आहे. IP67 रेटेड बॅटरी पॅक आणि मोटरने वेदरप्रूफ बनवते. Nexon EV प्राइम प्रमाणेच Tata Motors ने आपल्या Tigor EV मालकांना सॉफ्टवेअर अपडेटद्वारे मोफत फीचर अपडेट पॅक ऑफर करत आहे. ग्राहक त्यांची वाहने मल्टी-मोड रीजनरेशन, iTPMS आणि टायर पंक्चर दुरुस्ती किटसह अपग्रेड करू शकतात. याशिवाय ग्राहक XZ+ आणि XZ+ DT प्रकारांमध्ये स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी अपग्रेडचा लाभ घेऊ शकतात. 20 डिसेंबर 2022 पासून ग्राहकांना टाटा मोटर्सच्या कोणत्याही सेवा केंद्राला भेट देऊन या सेवेचा लाभ घेता येईल.
दरम्यान अलीकडेच मुंबईची स्टार्टअप कंपनी पर्सनल मोबिलिटी व्हेइकल्सने (PMV) आपली नवीन Eas-E इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. या कारची किंमत 4.79 लाख रुपये इतकी आहे.
इतर महत्वाची बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)