एक्स्प्लोर

Rare 1908 Harley-Davidson Bike: 115 वर्ष जुनी रुबाबदार बाईक, तब्बल 5.91 कोटींना विकली गेली

Rare 1908 Harley-Davidson Bike: कताच हार्ले डेव्हिडसनच्या एका व्हिंटेज बाईकचा लिलाव झाला आहे. ही बाईक 1908 मध्ये हार्ले डेव्हिडसनने (Harley-Davidson) बनवली होती, जिचा आता लिलाव करण्यात आला आहे.

Rare 1908 Harley-Davidson Bike: हार्ले डेव्हिडसन हे फक्त नाव ऐकलं तरी डोळ्यासमोर एक सुंदर आणि दमदार बाईकचं चित्र उभं राहतं. ही फक्त बाईक नाही तर अनेकांचं स्वप्न आहे. हार्ले डेव्हिडसनच्या (Harley-Davidson) बाईक या जगभरात प्रसिद्ध आहे. आपल्या दमदार इंजिन आणि कडक लूकसाठी ही बाईक जगभरात ओळखली जाते. मात्र ही बाईक खरेदी करणं, हे सर्वांना परवडण्यासारखं नाही. आज जशी ही बाईक प्रसिद्ध आहे, तशीच ही 100 वर्षांपूर्वी देखील जगभरात प्रसिद्ध होती. नुकताच हार्ले डेव्हिडसनच्या (Harley-Davidson) एका व्हिंटेज बाईकचा लिलाव झाला आहे. ही बाईक 1908 मध्ये हार्ले डेव्हिडसनने (Harley-Davidson) बनवली होती, जिचा आता लिलाव करण्यात आला आहे. या ही 115 वर्ष जुनी बाईक तब्बल 935,000 डॉलर्समध्ये विकली गेली आहे. भारतीय चलनात ही रकम जवळपास 5.91 कोटी रुपये इतकी होते. यासोबतच लिलावात विकली गेलेली ही जगभरातील सर्वात महागडी बाईक ठरली आहे.         

वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, 28 जानेवारी रोजी लास वेगासमधील मॅकम ऑक्शन्सने लिलाव आयोजित केला होता. मेकम ऑक्शन्सने स्ट्रॅप टँक (Harley-Davidson Strap Tank) मोटरसायकलचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता, जिथे त्याला 8,000 पेक्षा जास्त लाईक्स आणि 800 च्या जवळपास कमेंट्स मिळाले आहेत. फॉक्स बिझनेसच्या रिपोर्टनुसार, या बाईकच्या मॉडेलचे नाव 'स्ट्रॅप टँक' Harley-Davidson Strap Tank) होते. याच्या इंधनाच्या टाक्या फ्रेमला निकेल-प्लेटेड स्टीलच्या पट्ट्यांसह जोडलेल्या होत्या.

याबाबत माहिती देताना मॅकम ऑक्शन्सचे मोटारसायकल विभाग व्यवस्थापक ग्रेग अरनॉल्ड म्हणाले होते की, "आम्ही बाईकचे चांगले मार्केटिंग केले आणि हार्ले हा आतापर्यंतचा सर्वात प्रसिद्ध अमेरिकन मोटरसायकल ब्रँड आहे. त्यामुळे आम्हाला वाटले होते की, लिलावात ती चांगली कामगिरी करेल. मात्र या लिलावात ही जगातली सर्वात महागडी बाईक ठरली आहे.''

मॉर्निंग एक्स्प्रेसने याबाबत माहिती दिली आहे की, 1908 मध्ये कंपनीने याचे 450 मॉडेल बनवले होते. या मोटारसायकलचे फक्त 12 मॉडेल्स अजूनही जगात उपलब्ध आहेत. याच लिलावात आणखी एक 1907 स्ट्रॅप टँक (Harley-Davidson Strap Tank) बाईक विकली गेली होती. जिला 715,000 डॉलर्स इतकी किंमत मिळाली होती. मात्र या बाईकला लिलावात 1908 मॉडेलच्या तुलनेत कमी रक्कम मिळाली.

इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: 

Mahindra XUV 400: महिंद्रा XUV400 ची लोकांमध्ये मोठी क्रेझ, आतापर्यंत 15 हजाराहून अधिक युनिट्स बुक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gaja Marne: 'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
Elon Musk : जगातील अब्जाधीशांच्या यादीत उलटफेर, डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू एलन मस्क यांना धक्का, टेस्लाचे शेअर...
डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू एलन मस्क यांना धक्का,अब्जाधीशांच्या यादीत उलटफेर, कारण काय...
Mahakumbh 2025 : आज महाकुंभाचा शेवटचा दिवस, पहाटेपर्यंत 41 लाख भाविकांनी घेतली डुबकी; 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने होणार
आज महाकुंभाचा शेवटचा दिवस, पहाटेपर्यंत 41 लाख भाविकांनी घेतली डुबकी; 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने होणार
Govinda Reaction Amidst Divorce Rumors: 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबतचं अफेअर घटस्फोटाचं कारण? गोविंदा म्हणाला,
30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबतचं अफेअर घटस्फोटाचं कारण? गोविंदा म्हणाला, "मी सध्या माझ्या..."
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 AM : 26 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Babulnath Mandir Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीनिमित्त बाबुलनाथ मंदिरात भाविकांची गर्दीTrimbakeshwar Parli Vaijnath Mahashivratri 2025 : महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांमध्ये दर्शनाची लगबगBhimashankar Mahashivratri 2025:महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gaja Marne: 'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
Elon Musk : जगातील अब्जाधीशांच्या यादीत उलटफेर, डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू एलन मस्क यांना धक्का, टेस्लाचे शेअर...
डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू एलन मस्क यांना धक्का,अब्जाधीशांच्या यादीत उलटफेर, कारण काय...
Mahakumbh 2025 : आज महाकुंभाचा शेवटचा दिवस, पहाटेपर्यंत 41 लाख भाविकांनी घेतली डुबकी; 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने होणार
आज महाकुंभाचा शेवटचा दिवस, पहाटेपर्यंत 41 लाख भाविकांनी घेतली डुबकी; 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने होणार
Govinda Reaction Amidst Divorce Rumors: 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबतचं अफेअर घटस्फोटाचं कारण? गोविंदा म्हणाला,
30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबतचं अफेअर घटस्फोटाचं कारण? गोविंदा म्हणाला, "मी सध्या माझ्या..."
Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
EPFO द्वारे यूपीएस योजना राबवली जाणार, सर्वांना पेन्शन देण्यासाठी सरकारचं पाऊल, योजनांचं एकत्रीकरण करणार
सर्वांना पेन्शन देण्याची सरकारची तयारी, EPFO द्वारे यूपीएस योजना राबवली जाणार, योजनांचं एकत्रीकरण करणार
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
Nanded Gain bitcoin Cryptocurrency Scam: महाराष्ट्रात 6600 कोटींचा बिटकॉईन घोटाळा, महिन्याला 10 टक्के व्याजाच्या सापळ्यात गुंतवणुकदार फसले
महाराष्ट्रात 6600 कोटींचा बिटकॉईन घोटाळा, महिन्याला 10 टक्के व्याजाच्या सापळ्यात गुंतवणुकदार फसले
Embed widget