Stock Market : ...म्हणून ग्रामीण भागातही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक वाढली!
Stock Market : ग्रामीण भागातील लोक गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला लागले आहेत. सरकारच्या वेगवेगळ्या विकास कामांमुळे शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करावी लागली आणि त्यामुळे गावागावात पैसा खेळू लागला पण बँकांचा व्याज दर घटला. परिणामी लोकांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा पर्याय स्विकारला.
औरंगाबाद : शेअर मार्केट हा शब्द तसा हा शहरी लोकांशी परिचयाचा. पण गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातील लोक ही मोठ्या प्रमाणावर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला लागली आहेत. सरकारच्या वेगवेगळ्या विकास कामांमुळे शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करावी लागली आणि त्यामुळे गावागावात पैसा खेळू लागला पण बँकांचा व्याज दर घटला. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवण्यात ग्रामीण लोकांचा कल वाढत आहे, कसा जाणून घेऊयात...
औरंगाबाद पैठण रोडवरचं हे बिडकिन गाव. गावालगतच डी.एम.आय. सी चा प्रोजेक्ट होतोय. त्यामुळे इथली जमीन सरकारनं पाच पट्टीच्या वाढीव दराने अधिग्रहित केली . त्यामुळे गेल्या काही वर्षात गावाचं रूप बदललं. गावात चाळीस-पन्नास नॅशनलाईज बँकाच्या शाखा आहेत. पण व्याजदर नाही. त्यामुळेच इथल्या लोकांचा शेअर मार्केट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याकडे अधिक भर आहे. महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग 10 जिल्ह्यातून जातो सोलापूर धुळे औरंगाबाद जळगाव अशा महामार्गासाठी डीएमआयसीसाठी जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. त्यामुळे गावागावात पैसा खेळतोय मात्र बँकेत व्याजदर नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे.
बारा हजार लोकसंख्येच्या बिडकीन गावांमध्ये शेअर मार्केटमध्ये 10 ते 15 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याचा अंदाज आहे. औरंगाबाद जिल्ह्यात महामार्ग आणि डी. एम. आय. सी .साठी जमीन अधिग्रहीत केलेल्या गावांची संख्या ही जवळपास शंभर एवढी आहे. आणि यातील बहुतेक गावातील लोकांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली आहे .आणि ही गुंतवणूक कएक कोटीत आहे.
शेअर मार्केटची गुंतवणूक आता एका मोबाईलच्या एका क्लिकवर होते आहे. त्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांना देखील स्टॉक एक्सचेंज ,म्युचल फंड, गोल्ड आणि एसआयपी हे शब्द तोंडपाठ झालेत. त्यामुळे शेअर मार्केट मधला चढ-उतार पाहण्यामध्ये इथली मंडळी दंग असतात आणि या सगळ्या प्रकारात गावकऱ्यांची गुंतवणूक आहे.
ग्रामीण भागातील पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक याकडे कल वाढल्याचा बँकिंग तज्ञ मान्य करतात. आणि त्याला बँकेचा व्याजदर जबाबदार असल्याचे देखील त्यांचं मत आहे. मात्र ग्रामीण भागातल्या लोकांना शेअर मार्केटमधील गुंतवणूक जोखमीची ठरेल असं त्यांचं मत आहे .शिवाय शेअर मार्केट मधील अधिकची गुंतवणूक देखील जोखमीची असल्याचं देवीदास तुळजापूरकराचं मत आहे. सीए रोहन अचलिया म्हणतात की, गावागावात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक ही फायद्याचे आहे. बँकेचा व्याजदर घटल्याने लोक शेअर मार्केटकडे वळू लागले आहेत .मात्र यासाठी योग्य तज्ञांचे मार्गदर्शन घेण्याची गरज आहे. तरच फायदा होईल अन्यथा तोटा होण्याची शक्यता अधिक आहे.
मध्यंतरी आदानी पोटचे शेअर पडले त्यामुळे, या गावातील एक तरुण लाखो रुपायला बुडाला .तेव्हापासून तो गाव सोडून गेलाय. त्यामुळे गुंतवणूक जरी वाढत असली तरी जोखीम आहे हे नक्की.पण कधीकाळी उद्योजक आणि पैसेवाल्यांची गुंतवणुकीच ठिकाण म्हणून शेअर मार्केट समजलं जायचं. मात्र हेच शेअर मार्केट आता गावच्या कट्ट्यावर बसणारा पोरगा चालवतोय. हे ही सत्य आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Global Wealth Report 2021 : जग श्रीमंत, भारतीय उद्योगपती श्रीमंत, मात्र भारताच्या गरिबीत वाढ
- Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरात ईडीचे छापे
- उज्ज्वल भविष्यासाठी त्याने फूटपाथवर राहणाऱ्या चिमुरड्याचे अपहरण केलं आणि गजाआड झाला!
- Egyptian Mummy : CT scan च्या मदतीने तीन हजार वर्षांपूर्वीच्या 'ममी'चं गूढ उलघडणार, इटलीतील प्रयोग