Global Wealth Report 2021 : जग श्रीमंत, भारतीय उद्योगपती श्रीमंत, मात्र भारताच्या गरिबीत वाढ
Credit Suisse Report 2021: ग्लोबल वेल्थ रिपोर्टनुसार, भारताची एकूण संपत्ती 4.4 टक्क्यांनी घसरली आहे. पण महत्वाचं म्हणजे भारतीय उद्योगपतींच्या श्रीमंतीत वाढ झाली आहे. क्रेडिट सुईसने जाहीर केलेल्या वर्ल्ड वेल्थ रिपोर्ट 2021 अर्थात जागतिक संपत्ती अहवालामध्ये हे स्पष्ट झालं आहे.
मुंबई : गेल्या वर्षी कोरोनाचे संकट असतानाही जागतिक संपत्तीत 7.7 टक्क्यांची वाढ झाली आहे. तुलनेत भारताच्या संपत्तीमध्ये मात्र 4.4 टक्क्यांची घट झाल्याचं दिसून येतंय. विकसित देशांच्या तुलनेत विकसनशील आणि अविकसित देशांतील प्रति व्यक्ती संपत्तीत घट झाल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. तसेच भारतीय कोट्यधीशांची संख्याही 7.64 लाखांवरुन घटून ती 6.98 लाखांवर आली आहे. क्रेडिट सुईसने जाहीर केलेल्या वर्ल्ड वेल्थ रिपोर्ट 2021 अर्थात जागतिक संपत्ती अहवालामध्ये हे स्पष्ट झालं आहे.
क्रेडिट सुईसने जाहीर केलेल्या वर्ल्ड वेल्थ रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, भारतातील प्रत्येक कुटुंबाच्या संपत्तीत 4.4 टक्के घट झाली आहे तर प्रति व्यक्ती संपत्तीत 4.4 टक्क्याची घट झाली आहे. आकड्यांमध्ये सांगायचं झालं तर एकूण 594 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे.
या अहवालानुसार, देशातील प्रति व्यक्ती संपत्ती ही 10 लाख 57 हजार 177 रुपये इतकी आहे. 2000 ते 2020 या वर्षांमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या वार्षिक संपत्तीत 8.8 टक्क्यांची वाढ झाल्याचंही या अहवालात सांगण्यात आलं आहे. जागतिक पातळीवर हे प्रमाण 4.8 टक्के इतकं आहे.
2020 सालामध्ये जागतिक संपत्तीमध्ये 7.4 टक्क्यांची वाढ झाली असून प्रति व्यक्ती संपत्तीत 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या अहवालानुसार, उत्तर अमेरिका आणि युरोपियन देशांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे.
भारतातील उद्योगपतींची संपत्ती वाढली
कोरोनाच्या मंदीच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला गेली असताना भारतीत उद्योगपतींच्या संपत्तीवर याचा कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही. सर्वसामान्य भारतीयांच्या संपत्तीत घट होत असताना भारतीय उद्योगपतींची संपत्ती मात्र वाढल्याचं दिसून आलं आहे. जगभरातील कोट्यधीशांची संख्याही वाढून ती 5.61 कोटी इतकी झाली आहे तर या कोट्यधीशांची संपत्ती 28.7 लाख कोटी डॉलरने वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या :