एक्स्प्लोर

औरंगाबादेत कोरोनाबाधित रुग्णांसाठी हॉस्पिटल्सचे पॅकेज

खाजगी रुग्णालयांनी कोविड पॅकेज तयार केले आहेत. हे पॅकेज अगदी हॉलीडे पॅकेजप्रमाणे आहेत. औरंगाबादच्या प्रसिद्ध धूत हॉस्पिटल आणि वरकड हॉस्पिटलने असे पॅकेज जाहीर केले आहेत.

औरंगाबाद : आजवर आपण हॉलीडे पॅकेजबाबत ऐकलं असेल. त्याच धर्तीवर औरंगाबादेतील काही रुग्णालयांनी कोरोनावर घरीच राहून उपचार घेण्यासाठी काही पॅकेज जाहीर केले आहेत. राज्यातील कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव, कोरोनाबाधितांची वाढती संख्या यातून काही रुग्णालयांनी ही पॅकेजची आयडिया समोर आणली आहे. लक्षण असलेल्या आणि आणि सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी हे पॅकेज असणार आहेत. औरंगाबाद शहरातील दोन रुग्णालयांनी तशी जाहिरात केली आहे.

गरज ही शोधाची जननी असते असं म्हटलं जातं. कोरोनाचा कहर वाढत आहे. लसीचा शोधही सुरु झाला आहे. पण अद्याप बाजारात लस आलेली नाही. इंडियन मेडिकल कौन्सिलने तर भारतात कम्युनिटी स्प्रेडिंग सुरु झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. बाधितांची रोज वाढणारी संख्या बघून शंकेला वाव देखील आहे. हॉस्पिटल फुल्ल झालेत. रुग्णांवर उपचार करायला जागा कमी पडत आहेत. पण आता खाजगी रुग्णालयांनी कोविड पॅकेज तयार केले आहेत. हे पॅकेज अगदी हॉलीडे पॅकेजप्रमाणे आहेत. औरंगाबादच्या प्रसिद्ध धूत हॉस्पिटल आणि वरकड हॉस्पिटलने असे पॅकेज जाहीर केले आहेत.

धूत हॉस्पिटलचे पॅकेज

कोविड बाधित झालात आणि घरी राहून उपचार करायचे तर 10 दिवसांसाठी 6999 रुपयांचे पॅकेज आहे. या पॅकेजमध्ये औषधे डॉक्टर सांगतील. व्हिडीओ कॉल करतील आणि गरज वाटेल तेव्हा फोनद्वारे उपलब्ध होतील, अशी माहिती धूत रुग्णालयातील डॉक्टर हिमांशू गुप्ता यांनी दिली आहे.

वरकड हॉस्पिटलचे पॅकेज

या हॉस्पिटलमध्ये 31, 21, 13 आणि 10 हजार रुपयांचे पॅकेज उपलब्ध आहे. पॅकेजनुसार औषधे, मास्क, विविध तपासण्या करून मिळणार आहेत आणि डॉक्टर दररोज व्हिडीओ कॉलद्वारे बोलणार आहेत. शिवाय मानसोपचार तज्ज्ञ देखील फोनद्वारे समुपदेशन करणार आहेत.

औरंगाबादमध्ये दररोज सरासरी 300 नवे रुग्ण कोरोनाबाधित होत आहेत. शासकीय रुग्णालयातील खाटा आणि डॉक्टर यांच्यावर प्रचंड मोठा ताण आहे. त्यातूनच शासकीय रुग्णालयातील अस्वच्छता आणि जेवणाचा दर्जा याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळेच बाधित रुग्ण हा कोविड पेक्षा या असुविधेला जास्त घाबरतोय. आता खाजगी रुग्णालयांनी लक्षणे नसलेल्या बाधितांवर घरीच उपचार केले तर त्याचा फायदा रुग्णांना नक्कीच होणार आहे आणि शासकीय यंत्रणेवरील ताणही पर्यायाने कमी होणार आहे. पण खाजगी रुग्णालयांचे जाहीर होत असलेले पॅकेज पहिले तर आपत्तीची इष्टापत्ती होतेय की काय असाही सूर आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात मोठ्या बदलांची शक्यता, एकाचवेळी महानगरपालिकेच्या 23 नगरसेवकांचं पद जाणार? भाजपच्या 7 नगरसेवकांवर टांगती तलवार
छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात मोठ्या बदलांची शक्यता, एकाचवेळी महानगरपालिकेच्या 23 नगरसेवकांचं पद जाणार? भाजपच्या 7 नगरसेवकांवर टांगती तलवार
Uddhav Thackeray Eknath Shinde Shivsena With Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेंना आपल्यासोबत ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेनेची रस्सीखेच; कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन संपताच पुढे काय काय घडलं?
अभिजीत दीपकेंना आपल्यासोबत ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेनेची रस्सीखेच; कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन संपताच पुढे काय काय घडलं?
Tukaram Munde FDA News: सुट्टीच्या दिवशीही काम, FDA च्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार; तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
सुट्टीच्या दिवशीही काम, FDA च्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार; तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Abhijeet Dipke On Amit Shah: तुम्ही चाणक्य कसले, हे तर तुमचं अपयश, राजीनामा द्या; अभिजीत दीपकेंचा थेट अमित शाहांवर निशाणा
तुम्ही चाणक्य कसले, हे तर तुमचं अपयश, राजीनामा द्या; अभिजीत दीपकेंचा थेट अमित शाहांवर निशाणा

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Embed widget