एक्स्प्लोर

मराठवाड्यातील दुष्काळ पुढची पिढी पाहणार नाही, मराठवाड्यातील 11 धरणे पाईपलाईनने जोडणार : मुख्यमंत्री

मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी 11 प्रमुख धरणे पाईपलाईनने एकमेकांना जोडण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळ दूर होईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

औरंगाबाद : मराठावाड्यातील वर्षानुवर्ष सुरु असलेला पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा निर्धार मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यासाठी मराठवाड्यातील प्रमुख धरणे एकमेकांना जोडणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज औरंगाबादच्या लासूर स्टेशन गावच्या चारा छावणीला भेट दिली, त्यावेळी नागरिकांशी साधलेल्या संवादादरम्याने त्यांनी हे आश्वासन दिलं.

दुष्काळ दूर करण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे. मराठवाड्यातील दुष्काळ पुढची पिढी पाहणार नाही. तसेच मराठवाड्यातील दुष्काळ भूतकाळ असेल असा शब्द मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील जनतेला दिला. त्यासाठी उपाययोजनाही सुरु केल्या असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

मराठवाड्यातून दुष्काळ हद्दपार करण्यासाठी येथील प्रमुख 11 धरणे पाईपलाईनने एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. पाईपच्या माध्यमातून पिण्याचं पाणी मराठवाड्यात सर्वत्र पोहोचवलं जाणार आहे. पिण्याचे पाणी प्रत्येक ठिकाणी पोहचवण्याची वॉटर ग्रीड योजना आखण्यात आली आहे. इस्राईलसोबत करार करून हे काम पूर्ण केलं जाणार आहे. पुढील दोन महिन्यात यासाठी टेंडर काढणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

ही 11 धरणे पाईपलाईनने जोडणार
  • जायकवाडी (औरंगाबाद)
  • येलदरी (परभणी)
  • सिद्धेश्वर (हिंगोली)
  • माजलगाव (बीड)
  • मांजरा (बीड)
  • ऊर्ध्व पैनगंगा (यवतमाळ)
  • निम्न तेरणा (उस्मानाबाद)
  • निम्न मण्यार (नांदेड)
  • विष्णूपुरी (नांदेड)
  • निम्न दुधना (परभणी)
  • सिना कोळेगाव (उस्मानाबाद)
उर्ध्व पैनगंगा धरण विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील असलं तरी लाभक्षेत्र मराठवाडा असल्याने हे मराठवाड्याच्या 11 मोठ्या धरणांमध्ये येतं.

गोदावरीच्या खोऱ्यातून पश्चिम वाहिन्या नद्यांचे पाणी समुद्रात वाहून जाते. ते पाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यात आणले जाणार आहे. या संबधीचा प्लान तयार आहे.

"सरकारचा मेसेज आल्याशिवाय पेरणी करु नका"

शेतकऱ्यांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना पेरणी संदर्भातही आवाहन केलं. सरकार पाऊस आणि पेरणी संदर्भातील मेसेज शेतकऱ्यांना मोबाईलवर पाठवत आहे. यंदा पाऊस थोडा उशिरा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारच्या मेसेजनंतरच पेरणी करावी. त्यामुळे दुबार पेरणीची वेळ येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: एका आंदोलनाने देशाचा हिरो झाला, मुलीकडेची मंडळी लग्नासाठी अभिजीत दिपकेच्या आई-वडिलांच्या पाठी लागले, फोनवर फोन
एका आंदोलनाने देशाचा हिरो झाला, मुलीकडेची मंडळी लग्नासाठी अभिजीत दिपकेच्या आई-वडिलांच्या पाठी लागले, फोनवर फोन
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Water Storage Of All Maharashtra Dam: राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती
राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती
Jayakwadi Dam Water Storage: मराठवाड्याला मोठा दिलासा! अवघ्या 27 दिवसांत जायकवाडीत 25 टीएमसी पाण्याची भर; पाणीसाठा कुठवर? 
मराठवाड्याला मोठा दिलासा! अवघ्या 27 दिवसांत जायकवाडीत 25 टीएमसी पाण्याची भर; पाणीसाठा कुठवर? 

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Embed widget