एक्स्प्लोर

'मातोश्री'वरील शिवसेना आमदारांच्या बैठकीत मोबाईल फोनवर बंदी

शिवसेनेच्या आजच्या बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकतो. यानंतर शिवसेनेच्या आमदारांशी इतर कुणाचाही संपर्क होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी शिवसेनेच्या आमदारांची रवानगी नरिमन पॉईंट येथील हॉटेल ट्रायडंटमध्ये होणार आहे.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे सरकार स्थापनेबद्दल आपला निर्णय जाहीर करु शकतात. दरम्यान या बैठकीसाठी शिवसेना आमदार मातोश्रीवर पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. खबदारीचा उपाय म्हणून या बैठकीत मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आली आहे. तर मातोश्रीला छावणीचं स्वरुप आलं आहे. मातोश्रीबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यानंतर शिवसेनेच्या आमदारांशी इतर कोणाचाही संपर्क होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी शिवसेनेच्या आमदारांची रवानगी नरिमन पॉईंट इथल्या हॉटेल ट्रायडंटमध्ये होणार आहे. आमदार फुटीच्या भीतीने शिवसेना हे पाऊल उचलणार असल्याचं कळतं. सत्ताधाऱ्यांनी सर्व पक्षांचे आमदार फोडण्याचा गेल्या काही दिवसात प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यासाठी भाजपने गुंडांचा, धमक्यांचा वापर केल्याचेदेखील राऊत यांनी सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेने सावध पवित्रा घेतला आहे. तर भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करावा : संजय राऊत   सत्तास्थापनेचा संघर्ष अंतिम टप्प्यात आलेला असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल याचा पुनरुच्चार केला आहे. त्यासोबतच कोणत्याही परिस्थितीत शिवसेना आमदार फुटणार नाहीत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तसंच भाजपकडे 145 चा आकडा असेल तर त्यांनी सरकार स्थापनेचा दावा करावा. त्यांच्या हातात सत्ता, पैसा आणि पॉवर असल्यामुळे ते सत्ता स्थापनेचा प्रयत्न करतील. पण महाराष्ट्रात आम्ही ते होऊ देणार नाही, असं म्हणत राऊत यांनी भाजपला आव्हान दिलं आहे. भाजप नेते राज्यपालांची भेट घेणार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन आठवडे सुरु असलेला सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिनिधी म्हणून आज चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार  राज्यपालांची भेट घेणार आहेत. दुपारी 2 वाजता ही भेट होणार आहे. यात भाजप सत्ता स्थापनेचा दावा करतं का हे पाहणं महत्वाचं आहे. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून चौदा दिवस लोटले तरी राज्यातील सत्तेचा पेच सुटलेला नाही. त्यामुळे अनेक कामं आणि निर्णय रखडले आहेत. तसंच 9 नोव्हेंबर रोजी राज्याच्या विधीमंडळाची मुदतही संपतं आहे. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रपती राजवट लागू होऊ नये यासाठी आजच सत्तेचा तिढा सोडवणं आवश्यक आहे. त्यादृष्टीने मुंबईत आज घडमोडी वेगाने घडत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Indian Boxers News : भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
Embed widget