एक्स्प्लोर

'औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचं स्वप्न मनसेच पूर्ण करणार', बॅनरद्वारे मनसेचा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न

छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती आहे. या निमित्ताने मनसेने बॅनर लावून शुभेच्छा तर दिल्या आहेतच पण त्याच वेळी शिवसेनेला डिवचण्याचं कामही केलं आहे.

औरंगाबाद : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बॅनर लावले आहेत. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचं  स्वप्न मनसे पूर्ण करणार, असे बॅनर शहराच्या चौकाचौकात लावलेले दिसत आहेत. औरंगाबादमध्ये शिवसेनेची पहिली शाखा ज्या गुलमंडीवर स्थापन झाली तिथे हे बॅनर लावून शिवसेनेला पुन्हा एकदा औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा प्रलंबित प्रश्न पुन्हा उपस्थित करण्यात आला.

छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती आहे. या निमित्ताने मनसेने बॅनर लावून शुभेच्छा तर दिल्या आहेतच पण त्याच वेळी शिवसेनेला डिवचण्याचं कामही केलं आहे. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा जो प्रलंबित प्रश्न आहे तो मार्गी लावण्याचं काम मनसे करेल, अशाप्रकारचा मजकूर बॅनरवर लिहिला आहे. "होय! हे संभाजीनगरच.. तमाम हिंदूंचे हे स्वप्न मनसेच पूर्ण करणार. महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छ," असा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे. औरंगाबादमधील मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी हे बॅनर लावलं आहे. त्यामुळे औरंगाबादचं नामांतर आणि हिंदुत्त्वाचा मुद्दा मनसे पुढे घेऊन जात असल्याचं दिसत आहे. 

Aurangabad : औरंगाबाद की संभाजीनगर? या शहराचं नाव आलं कुठून?

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणे हे शिवसेनेचे स्वप्न आहे. गेल्या पंचवीस वर्षात शिवसेना संभाजीनगरचा मुद्दा अस्मितेचा केला आहे. औरंगाबाद की संभाजीनगर यावरुन गेल्या 30 वर्षांपासून औरंगाबादचं राजकारण केंद्रीत आहे. सत्तेत आल्यानंतर औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करणार असं आश्वासन शिवसेनेच्या वतीने देण्यात आलं होतं. परंतु या नामांतराला महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मात्र विरोध आहे.

औरंगाबाद शहराच्या नावाचा इतिहास काय?
औरंगाबाद या शहराचं नावाजलेलं नाव म्हणजे खडकी, हा परिसर बेसाल्ट खडकावर वसलेला आहे त्यात शहरात अगदी प्राचिन असे खडकेश्वर महादेवाचं मंदिर आहे, याच नावावरुन या शहराचे नाव खडकी पडले असावे असं इतिहासात नोंद आहे.  त्याकाळी या शहराचा राजा मलिक अंबर होता खऱ्या अर्थाने नहरे ए अंबरी सारख्या पाणीपुरवठ्याच्या आधुनिक वास्तू उभारुन त्याने या गावाचं शहर केलं. मात्र त्यानेही या खडकी नावात कुठलाही बदल केला नाही. कालांतराने 1633 मध्ये मलिक अंबरचा मुलगा फतेह खान या शहराचा राजा झाला आणि त्याने आपल्या नावावरुन या शहराचे नाव फतेहनगर असे ठेवले. 1653 मध्ये औरंगजेब डेक्कन विभागाचा सुभेदार म्हणून औरंगाबादेत आला. त्याने पुन्हा या शहराचं नाव फतेहनगरवरुन खुजिस्ता बुनियाद असे ठेवले, कालांतराने हे नाव सुद्धा बदलण्यात आले आणि त्यानंतर या शहराला सध्याचे आहे हे औरंगाबाद हे नाव मिळालं. ब्रिटीश काळातही हेच नाव कायम राहिले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Water Crisis : बीड जिल्ह्यात पाणीटंचाईमुळं जीव गमावला, विहिरीत पडून महिलेचा मृत्यू, कुटुंब उघड्यावर
बीड जिल्ह्यात पाणीटंचाईमुळं जीव गमावला, विहिरीत पडून महिलेचा मृत्यू, कुटुंब उघड्यावर
Rekha : रिचा चढ्ढाच्या होणाऱ्या बाळाला रेखाने दिला 'असा' आशीर्वाद, चाहते म्हणाले, निर्मळ हृदयाची अभिनेत्री...; पाहा व्हिडीओ
रिचा चढ्ढाच्या होणाऱ्या बाळाला रेखाने दिला 'असा' आशीर्वाद, चाहते म्हणाले, निर्मळ हृदयाची अभिनेत्री...; पाहा व्हिडीओ
'मोदींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींनी औकातीत राहावं', चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका
'मोदींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींनी औकातीत राहावं', चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका
Sanjay Raut : 'ईव्हीएम बंद पडणं हे मोदीकृत भाजपचं षड्यंत्र', संजय राऊतांचा गंभीर आरोप
'ईव्हीएम बंद पडणं हे मोदीकृत भाजपचं षड्यंत्र', संजय राऊतांचा गंभीर आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nanded Lok Sabha Election : वंचितचे उमेदवार अविनाश भोसीकर यांचं ठिय्या आंदोलनBaburao Kohalikar Voting : बाबुराव कोहळीकरांनी व्यक्त केला विजयाच विश्वासVishal Patil Sangli : चंद्रहार पाटील चालणार नाही, त्यांनी माघार घ्यावी; विशाल पाटील गरजलेParbhani boycott Election : मागणी मान्य न केल्यानं गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Water Crisis : बीड जिल्ह्यात पाणीटंचाईमुळं जीव गमावला, विहिरीत पडून महिलेचा मृत्यू, कुटुंब उघड्यावर
बीड जिल्ह्यात पाणीटंचाईमुळं जीव गमावला, विहिरीत पडून महिलेचा मृत्यू, कुटुंब उघड्यावर
Rekha : रिचा चढ्ढाच्या होणाऱ्या बाळाला रेखाने दिला 'असा' आशीर्वाद, चाहते म्हणाले, निर्मळ हृदयाची अभिनेत्री...; पाहा व्हिडीओ
रिचा चढ्ढाच्या होणाऱ्या बाळाला रेखाने दिला 'असा' आशीर्वाद, चाहते म्हणाले, निर्मळ हृदयाची अभिनेत्री...; पाहा व्हिडीओ
'मोदींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींनी औकातीत राहावं', चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका
'मोदींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींनी औकातीत राहावं', चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका
Sanjay Raut : 'ईव्हीएम बंद पडणं हे मोदीकृत भाजपचं षड्यंत्र', संजय राऊतांचा गंभीर आरोप
'ईव्हीएम बंद पडणं हे मोदीकृत भाजपचं षड्यंत्र', संजय राऊतांचा गंभीर आरोप
IPL 2024: RCB vs SRH: 6,6,6,6....रजत पाटीदारने टोलावले लागोपाठ चार षटकार; विराट कोहलीही पाहत राहिला, पाहा Video
6,6,6,6....रजत पाटीदारने टोलावले लागोपाठ चार षटकार; विराट कोहलीही पाहत राहिला, पाहा Video
Shruti Haasan : अनेक वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर सुपरस्टारच्या लेकीचं ब्रेकअप? म्हणाली, 'माझ्यासाठी नात्यात विश्वास महत्त्वाचा'
अनेक वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर सुपरस्टारच्या लेकीचं ब्रेकअप? म्हणाली, 'माझ्यासाठी नात्यात विश्वास महत्त्वाचा'
Dindori Lok Sabha : दिंडोरीत महाविकास आघाडीच्या फुटीवर शिक्कामोर्तब, नाराज जे पी गावित आज भरणार उमेदवारी अर्ज
दिंडोरीत महाविकास आघाडीच्या फुटीवर शिक्कामोर्तब, नाराज जे पी गावित आज भरणार उमेदवारी अर्ज
भारताला फायदा चीनला फटका, व्यापारात भारतानं घेतली आघाडी, सेवा निर्यातीत मोठी वाढ
भारताला फायदा चीनला फटका, व्यापारात भारतानं घेतली आघाडी, सेवा निर्यातीत मोठी वाढ
Embed widget