एक्स्प्लोर

म्हाडाची लॉटरी निघाली, 936 घरांसाठी औरंगाबाद मंडळानं काढली जाहिरात, 22 मार्चला सोडत

MHADA Lottery :  म्हाडाच्या औरंगाबाद गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे 936 घरांची जाहिरात निघाली आहे.

MHADA Lottery :  म्हाडाच्या औरंगाबाद गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे 936 घरांची जाहिरात निघाली आहे. त्यामध्ये 849 सदनिका (फ्लॅट्स) आणि 87 भूखंडांचा समावेश आहे.  प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) आणि म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत औरंगाबाद, लातूर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद येथे उभारलेल्या 936 घरांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ आज करण्यात आला. सोडतीसाठी दिनांक 09 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 12 वाजेपासून ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. 10 मार्च 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.  

MHADA Housing Lottery System IHLMS 2.0 या संगणकीय ऍप अंतर्गत व https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी जरी अमर्याद काळ सुरु राहणार आहे. तरी उपरोक्त नमूद मुदतीनंतर सोडतीत सहभाग घेण्याची लिंक संकेतस्थळ आणि अॅप वरून निष्क्रिय करण्यात येणार आहे. सोडतीसाठी अॅप आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून अर्ज नोंदणी तसेच अर्ज सादर करणे आदी सर्व प्रक्रिया विनाशुल्क आहे. आज औरंगाबाद मंडळाच्या मुख्यालयात याबाबत कार्यक्रम झाला.  या कार्यक्रमाला  औरंगाबाद मंडळाचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे, औरंगाबाद महानगरपालिकेचे शहर अभियंता अविनाश देशमुख, निवृत्त जिल्हा न्यायाधीश शेटे, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, देखरेख समितीचे सदस्य उपस्थित होते. 

सोडतीसाठी ऑनलाईन अनामत रकमेच्या स्वीकृतीस 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तर 11 मार्चपर्यंत  ऑनलाईन अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे. तसेच दिनांक 13 मार्च संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. अशाप्रकारे सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदाराच या प्रणालीद्वारे  पात्र ठरविले जाणार असून सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी 18 मार्च रोजी  म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर केली जाणार आहे. दिनांक 22 मार्च, 2023 रोजी पात्र अर्जदारांची संगणकीय सोडत औरंगाबाद येथील मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे सकाळी 11 वाजता जाहीर केली जाणार असून अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे, ई-मेल द्वारे, ऍपवर तसेच संकेतस्थळावर प्राप्त होणार आहे.   

म्हाडातर्फे तयार करण्यात आलेले MHADA Housing Lottery System IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management system) या नूतन संगणकीय ऍपचा वापर करणारे औरंगाबाद मंडळ हे म्हाडाचे दुसरे मंडळ आहे. नव्या प्रक्रियेनुसार नोंदणीकरणा दरम्यान सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार हे म्हाडाच्या विविध मंडळांच्या संगणकीय सोडतीतील कायमस्वरूपी पात्र अर्जदार ठरणार आहे.      

नवीन आज्ञावली नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने उत्कृष्ट ठरणार आहे कारण अर्जदार घरबसल्या अथवा कुठूनही सोडत प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात. नोंदणीकरण, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाईन पेमेंट यांसारख्या सुविधा या ऍपच्या माध्यमातून सहजरित्या उपलब्ध होणार आहेत. सोडतीत सहभागी होण्याकरिता MHADA Housing Lottery System IHLMS 2.0 ही संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड (android) अथवा आयओएस (ios) या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमच्या साहाय्याने आपल्या मोबाईलवर डाउनलोड करू शकतात. अर्जदारांच्या सोयीकरिता  https://housing.mhada.gov.in  या म्हाडाच्या अधिकृत संकेत स्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध  करून देण्यात आली आहे. तसेच येथे ऍप डाउनलोड करण्याची लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहितीपुस्तिका, व्हिडीओस, हेल्प फाईल आणि हेल्प साईट या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहितीचे अवलोकन करावे, असे आवाहन औरंगाबाद मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. अण्णासाहेब शिंदे यांनी केले आहे.     

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Arrest सैफचा आरोपी 'या' लेबर कँपमध्ये लपला होता, 'माझा'चा Exclusvie ReportBharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
Pandharpur Crime : चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
Dhananjay Munde: मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
Embed widget