एक्स्प्लोर
Advertisement
औरंगाबाद महापालिकेत राडा, एमआयएमच्या पाच नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द
इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावारुन औरंगाबाद महापालिकेत राडा, एमआयएम नगरसेवकाकडून राजदंड पळवण्याचा प्रयत्न, एमआयएमच्या पाच नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द
औरंगाबाद : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. एमआयएमच्या नगरसेवकांनी औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील (एमआयएम) यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर काही नगरसेवकांनी इतर खासदारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्याबाबत मुद्दा मांडला. त्यामुळे एमआयएमच्या नगरसेवकांनी महापालिकेत राडा केला.
या गोंधळादरम्यान एमआयएमच्या एका नगरसेवकाने राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठा वादही झाला. परिणामी गोंधळ घालणाऱ्या एमआयएमच्या पाच नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची सुरुवातच आज मोठ्या गोंधळाने झाली होती. एमआयएमच्या नगरसेवकांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाच्या प्रस्ताव मांडला. त्यानंतर काही नगरसेवकांनी इतर खासदारांचे अभिनंदन करण्यात यावे, अशी मागणी मांडली. यावरुन नगरसेवकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
सभेत गोंधळ सुरु झाल्यानंतर एमआयएमच्या एका नगरसेवकाने राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महापौर नदंकुमार घोडे यांनी एमआयएमच्या पाच नगरसेवकांचे एका दिवसासाठी सदस्यत्व रद्द केले आहे.
महापालिकेतील गोंधळाचा व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement