रावसाहेब दानवेंच्या भावजाईंचा दणदणीत विजय, भाजपची तीस वर्षांपासूनची सत्ता कायम
Gram Panchayat Election Result 2022: रावसाहेब दानवे यांच्या भावजाई सुमन मधुकर दानवे यांचा दणदणीत विजय झाला आहे.
![रावसाहेब दानवेंच्या भावजाईंचा दणदणीत विजय, भाजपची तीस वर्षांपासूनची सत्ता कायम maharashtra News Jalna News BJP's victory in Raosaheb Danve birthplace BJP has been in power for thirty years BJP has been in power for thirty years रावसाहेब दानवेंच्या भावजाईंचा दणदणीत विजय, भाजपची तीस वर्षांपासूनची सत्ता कायम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/20/e391ea6b5d5b430c6174fd7d995ca63b167152982826689_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gram Panchayat Election Result 2022: राज्यातील सात हजार पेक्षा अधिक ग्रामपंचायतसाठी झालेल्या मतदानानंतर आज निकाल हाती येत आहे. दरम्यान या निकालात राजकीय नेत्यांच्या गावातील आणि नात्यागोत्याच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्याचे देखील निकाल आता समोर येत आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या जन्मगाव जवखेडा खुर्द गावात तब्बल 30 वर्षांनंतर यंदा निवडणूक झाली होती आणि ज्यात दानवे यांच्या भावजाई सुमन मधुकर दानवे यांचा दणदणीत विजय झाला आहे. तर राष्ट्रवादीच्या सुनिता संतोष दानवे यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे गेल्या 30 वर्षांपासूनची सत्तेची परंपरा भाजपने कायम ठेवली आहे.
ग्रामपंचायतींची रणधुमाळीत अनेक राजकीय पक्षांच्या (Political Party) मोठ्या नेत्यांकडून आपापल्या मतदारसंघात आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले होते. तर आपली प्रतिष्ठा पणाला लागलेल्या ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी देखील नेत्यांकडून प्रयत्न केले जात होते. दरम्यान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या जन्मगाव असलेल्या जवखेडा खुर्द गावात देखील निवडणूक पार पडली होती. तर या निवडणुकीत दानवे यांच्या भावजाई सुमन मधुकर दानवे सरपंच पदासाठी रिंगणात होत्या.
गेली 30 वर्ष बिनविरोध भाजपच्या ताब्यात असणाऱ्या या ग्रामपंचायतीमध्ये एकूण 7 सदस्य संख्या आहे. ज्यात 4 सदस्य बिनविरोध निवडण्यात आले होते. त्यामुळे सरपंच पदासाठी आणि दोन सदस्यांसाठी या गावात निवडणूक झाली होती. दरम्यान हाती आलेल्या निकालानंतर आता दानवे यांच्या भावजाई सुमन मधुकर दानवे यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांचा जवखेडा खुर्द गावात दबदबा पाहायला मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)