एक्स्प्लोर

Marathwada Teacher Constituency Election: मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार; माघारीसाठी आजचा शेवटचा दिवस

Election: मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी 15 उमेदवारांनी अर्ज दाखल झाले आहेत.

Marathwada Teacher Constituency Election: विधान परिषदेच्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी 15 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून छाननीत हे सर्व अर्ज वैध ठरले आहेत. तर आज उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळे 15 पैकी नेमके किती उमेदवार निवडणूक रिंगणात असतील, हे दुपारी तीन वाजेनंतर स्पष्ट होणार आहे.

मराठवाडा विभाग शिक्षक मतदारसंघासाठी 12 जानेवारीपर्यंत 15 उमेदवारांनी 30 अर्ज दाखल केले आहेत. यात राष्ट्रवादीकडून विक्रम काळे, भाजपचे किरण पाटील, वंचितचे कालिदास माने, अपक्ष उमेदवार अनिकेत वाघचवरे, अश्विनीकुमार क्षीरसागर, आशिष देशमुख, कादरी शाहेद अब्दुल गफार गणेश शेटकर, नितीन कुलकर्णी, प्रदीप साळुंके, मनोज पाटील, विशाल नांदरकर, सूर्यकांत विश्वासराव, संजय तायडे, ज्ञानोबा डुकरे यांचा समावेश आहे. त्यामुळे आज उमेदवारी अर्ज कोण मागे घेणार, याकडे शिक्षक मतदार संघातील मतदारांचे लक्ष लागले आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत ही प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर शिल्लक उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशित केली जाणार आहे. मराठवाड्यात शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 61  हजार 529  मतदार आहेत. तर 222  मुळ आणि 5 सहायकारी असे एकूण 227 मतदान केंद्र मतदानासाठी सज्ज आहे. 

खरी लढत राष्ट्रवादी-भाजपमध्ये? 

मराठवाडा शिक्षक मतदारसंघात एकूण 15 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र यातील काही उमेदवारी अर्ज आज परत घेण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात खरी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीकडून विक्रम काळे आणि भाजपकडून किरण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असून, दोन्ही उमेदवार आपणच जिंकणार असल्याचा दावा करत आहे. 

 मतदार आणि केंद्रसंख्या 

जिल्हा  मतदार संख्या  केंद्रसंख्या 
औरंगाबाद  13924  53
जालना  5037 15
परभणी  4472 18
हिंगोली  3060 12
नांदेड  8821 30
बीड   9769 34
लातूर 11264 40
उस्मानाबाद  5182 25

Marathwada Teacher Constituency Election : मराठवाडा विभाग शिक्षक मतदारसंघासाठी 15 उमेदवारांचे 30 अर्ज दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरेUddhav Thackeray : बाळासाहेबांचा जिव्हाळा असलेल्या शहरात झालेला गद्दाराचा विजय खटकलाUddhav Thackeray on Amit Shah : अमित शाहांना नवरत्न तेल द्या; बुद्धी तल्लख होईल - उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
Dilip Walse Patil: 'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Mike Tyson vs Jake Paul : 27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
×
Embed widget