Aurangabad: औरंगाबादचे दरवाजे इतिहासात पहिल्यांदा रोषणाईने सजले; शहराच्या सौंदर्यात आणखी भर
Aurangabad News: औरंगाबादच्या इतिहासात प्रथमच शहरातील 6 ऐतिहासिक दरवाज्यांवर रोषणाई करण्यात आली आहे.
Aurangabad Gate Lighting: बावन्न दरवाज्यांचं शहर म्हणून औरंगाबाद शहराची ओळख आले. तर आता याच ऐतिहासिक दरवाज्यांची रोषणाई शहराच्या सौंदर्यातच भर घालत आहे. औरंगाबादच्या इतिहासात प्रथमच शहरातील 6 ऐतिहासिक दरवाजे आणि शहागंज क्लॉक टॉवरवर कायमस्वरूपी दर्शनी दिवे बसवण्यात आले आहे. औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त तथा औरंगाबाद स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटी हेरिटेज संवर्धन प्रकल्पांतर्गत शहरातील हेरिटेज वास्तूंवर रोषणाई करण्यात येत आहे.
औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (ए.एस.सी.डी.सी.एल) वारसा संवर्धन प्रकल्पांतर्गत पैठण गेट, रोशन गेट, कटकट गेट, खिजरी गेट, काला गेट, तटबंदी भिंत सह नौबत गेट, जाफर गेट, बारापुल्ला गेट मेहमूद गेट आणि रंगीन गेट असे 10 ऐतिहासिक दरवाजे आणि निजामकालीन शाहगंज क्लॉक टॉवरचा जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण करण्यात येत आहे. दरम्यान मनपा आयुक्त चौधरी यांच्या निर्देशानुसार रोषणाईच्या कामाची चाचणी घेण्यात आली असून, ऐतिहासिक दरवाज्यांपैकी 6 दरवाजांवर कायमस्वरूपाची रोषणाई करण्यात आली आहे. इतिहासात पहिल्यांदा असे घडले आहे की, ज्या दरवाज्यांमुळे शहराला 'सिटी ऑफ गेट्स' अशी ओळख आहे, त्या दरवाजांवर कायमस्वरूपी रोषणाई करण्यात आली आहेत.
जयपूर स्थित एजन्सी गीयर्सला वास्तूंची रोषणाई करण्यासाठी निविदा प्रक्रियेद्वारे नेमण्यात आले. ही एजन्सी यापूर्वी ग्वालियर स्मार्ट सिटी आणि इतर शहरांमध्येही कार्यरत आहे. 6 ऐतिहासिक दरवाजे आणि शाहगंज क्लॉक टॉवरवर रोषणाई पूर्ण झाली आहे. लाइटिंग कॉन्ट्रॅक्टमध्ये 1 वर्षाची वॉरंटी आणि 4 वर्षांची देखभाल समाविष्ट आहे.
अन्यथा कारवाई...
स्मार्ट सिटीने शहरातील ऐतिहासिक दरवाज्यांवर केलेली रोषणाई शहराच्या सौंदर्यातच भर घालत आहे. मात्र प्रशासनाबरोबर सर्वसामन्य नागरिकांची सुद्धा याची काळजी घेण्याची जवाबदारी आहे. तर नागरिकांनी दिवाबत्ती सुरक्षित राहावी यासाठी जबाबदार राहण्याचे आवाहन आयुक्त यांनी केले आहे. तसेच दिवे किंवा हेरिटेज वास्तूंचे नुकसान करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्तांनी बजावले आहे.
जुन्या वास्तू अतिक्रमणांपासून मुक्त करण्याचा प्रयत्न
वारसा संवर्धन प्रकल्पांतर्गत प्रकल्पाचा एक भाग म्हणून, 4 शतके जुन्या वास्तू, झाडझुडूप, अतिक्रमणांपासून मुक्त करण्यात आल्या आहे. शहराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि नागरिकांमधील शहरातील वारशासाठी अभिमान आणि आपलेपणाची भावना विकसित करण्याच्या उद्देशाने पारंपारिक पद्धती आणि साहित्य वापरून संवर्धन करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: कंटेनर चालकाची नियत फिरली, 20 लाखांच्या व्हिस्कीसह ट्रकच पळवला