Amit Thackeray: अमित ठाकरे आजपासून दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर
Aurangabad : अमित ठाकरे हे शुक्रवारी मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसह मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेणार आहेत.
Amit Thackeray In Aurangabad: मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र तथा मनसे विध्यार्थी सनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे आजपासून औरंगाबादच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. आज सांयकाळी 6 वाजता ते शहरात दाखल होणार असून, शुक्रवारी मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसह मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेणार आहेत. अमित ठाकरे हे सद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून, औरंगाबाद जिल्ह्यात या दौऱ्याचा शेवट होणार आहे.
मनसेच्या स्थानिक नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी चिकलठाणा विमानतळ ते हॉटेल रामा अशा वाहन रॅलीच्या माध्यमातून मनसे कार्यकर्ते अमित ठाकरे यांचे स्वागत करणार आहेत. तर शुक्रवारी सकाळी 10 वाजता विद्यार्थी सेनेची बैठक होणार आहे. त्यानंतर 12 वाजता मनसे पदाधिकारी, दुपारी 2 ते 4 ग्रामीण पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पक्षबांधणीवर चर्चा केली जाणार आहे. पुढे अमित ठाकरे खोकडपुरा येथील सदस्य नोंदणी अभियानास भेट, त्याच ठिकाणी विविध पक्षांतील कार्यकत्र्यांचा प्रवेश सोहळा आणि सायंकाळी उस्मानपुरा येथील मनसे कार्यालयास ते भेट देणार आहेत. उस्मानपुरा येथील जिल्हा संपर्क कार्यालयास भेट दिल्यानंतर वेरुळ येथे दर्शनासाठी ते रवाना होणार आहेत.
निवडणुकीची तयारी....
राज्यात एकीकडे शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडी असा राजकीय वाद रंगला असतानाच, दुसरीकडे मनसेकडून मात्र आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने तयारी करण्यात येत आहे. अमित ठकारे राज्यातील वेगवेगळ्या विभागाचा टप्या-टप्याने दौरा करत आहे. तर खुद्द राज ठाकरे सुद्धा अधूनमधून महत्वाच्या शहराचा दौरा करत कार्यकर्त्यांमध्ये उर्जा निर्माण करतायत. त्यामुळे आगमी स्थानिक निवडणुकीत मनसे मोठ्या तयारीने उतरण्याची शक्यता आहे. तर पक्षातील नेत्यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साहा पाहायला मिळत आहे.
अमित ठाकरे काय बोलणार...
राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडीपासून मनसेने दोन हात लांब राहण्याची भूमिका घेतली असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे अशात आज औरंगाबाद दौऱ्यावर असलेले अमित ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच आगामी निवडणूकीच्या अनुषंगाने सुद्धा ते काय बोलणार हे सुद्धा पाहणं महत्वाचे ठरणार आहे.