Aurangabad Crime: 'स्वामी'च्या प्रेमकथेचा असा झाला शेवट; क्रूरपणा पाहून महाराष्ट्र हादरला
Aurangabad Crime News: सौरभ याचे कुटुंबातील सदस्य प्रचंड धर्मिक आहेत. तर खुद्द सौरभ सुद्धा एका मंदिरात अधूनमधून पूजापाठ करायचा.
Aurangabad Crime News: प्रेम कधी आणि कुणासोबत होईल याचा अंदाज लावला जाऊ शकत नाही. पण एखांद्या प्रेमकथेचा शेवट जेव्हा क्रूरपणे होतो. अशाच एका औरंगाबादच्या हत्येच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. आपल्याच प्रेयसीची आधी गळा दाबून हत्या केली. त्यानंतर डोके आणि हात कापून गोदामात ठेवलं. तर उरलेले शरीराचे भाग घेण्यासाठी आला आणि त्याचा क्रूरपणा सगळ्यासमोर आला. अंकिता श्रीवास्त असे विवाहित प्रेयसीचं नाव असून स्वामी उर्फ सौरभ लाखे असं हत्या करणाऱ्या विवाहित प्रियकर आरोपीचे नाव आहे.
सौरभ हा वैजापूर तालुक्यातील शिऊर गावात राहायचा. याच गावात मिठाईची दुकान असलेले महेश श्रीवास्तव सुद्धा राहायचे. दोघांचे घर जवळच असल्याने ओळख होती. याच काळात महेश यांची पत्नी अंकिता आणि सौरभ यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. प्रकरण एवढं वाढलं की गावात चर्चा होऊ लागली. त्यामुळे एकदिवस अंकिता घर सोडून निघून गेली. त्यानंतर तिने विभक्त राहण्याचा निर्णय घेतला आणि औरंगाबाद शहरातील हडको परिसरात रूम करून राहू लागली. पण या सर्व काळात सौरभ तिच्यासोबत होता.
प्रेमाचा भांडा फुटला...
सौरभ आणि अंकिता यांच्यातील प्रेमकथेची सुरवातीला गावात दबक्या आवाजात चर्चा होती. मात्र एकदिवस दोघांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी घराच्या गच्चीवर रंगेहात पकडले. त्यामुळे प्रकरण पोलिसात गेले. पोलिसांनी दोघांना समज दिली होती. त्यामुळे विषय संपलं असे इतरांना वाटत असतांना प्रत्यक्षात मात्र सौरभ आणि अंकिता यांच्यातील प्रेमकथेच्या दुसऱ्या टप्प्याला तेथूनच सुरवात झाली होती.
सौरभ गावातील 'स्वामी'
सौरभ याचे कुटुंबातील सदस्य प्रचंड धर्मिक आहेत. तर खुद्द सौरभ सुद्धा एका मंदिरात अधूनमधून पूजापाठ करायचा. त्यामुळे सौरभला गावात सर्वजण 'स्वामी' म्हणूनच ओळखायचे. गावातील धार्मिक कार्यक्रमात स्वामी नेहमी सहभागी असायचा. त्यातच एका स्थानिक युट्यूब चैनलसाठी तो काम करायचा. पण तीन वर्षांपूर्वी त्याच्या आयुष्यात अंकिता आली स्वामीचं आयुष्यच बदललं. पण आपल्या प्रेमाचा एवढ्या क्रूरपणाने स्वामीने अंत केला असावा यावर अजूनही गावातील लोकांचा विश्वास बसत नाही.
असा रचला कट..
सौरभ 14 ऑगस्टला अंकिताला भेटायला आला. त्यावेळी तिने मला तुझ्यासोबतच राहायचं असल्याचा तगादा लावला. त्यामुळे तिला 14 ऑगस्टच्या रात्री तो शिऊरला घेऊन आला. आपल्या दुकानात मुक्काम केला. पहाटे पुन्हा एका मित्राच्या मदतीने अंकिताला शहरात पाठवून दिले. दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्टला पुन्हा अंकिताकडे आला. त्यानंतर तिचा गळा दाबून हत्या करून घराला कुलूप लावून निघून गेला. 16 ऑगस्टला पुन्हा आला आणि सोबत आणलेल्या कोयत्याने मुंडकं आणि हात कापून एका पिशवीत टाकून गावाकडे घेऊन गेला. गावातील दुकानात ते एका ठिकाणी लपवून ठेवून दिले.
त्यानंतर पुन्हा 17 ऑगस्टला घटनास्थळी चारचाकी गाडी घेऊन आला. दरवाजा उघडून उरलेले शरीराचे भाग एका गोणीत ठेवले आणि पुन्हा गावाकडे निघाला. मात्र याच दरम्यान शेजारच्या महिलांना वास आला आणि प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. त्यानंतर पोलिसांनी नाकेबंदी करून सौरभला ताब्यात घेतले.
महत्वाच्या बातम्या....
Aurangabad Crime: युट्यूबरने आधी प्रेयसीचा गळा चिरला, त्यानंतर मृतदेहाचे तुकडे घेऊन पोलिसात पोहचला