Marathwada Teacher Constituency Election: मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादीत बंडखोरीची शक्यता
Marathwada Teacher Constituency Election: राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप सोळुंके यांनी, तर नांदेडमधील भाजपचे पदाधिकारी नितीन कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत.
Marathwada Teacher Constituency Election: मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी भरण्याची आज आणि उद्या असे दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. दरम्यान त्यापूर्वीच भाजप (BJP), राष्ट्रवादीत (NCP) बंडखोरीची शक्यता वर्तवली जात आहे. कारण या दोन्ही पक्षाकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले असतानाच, राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप सोळुंके यांनी, तर नांदेडमधील भाजपचे पदाधिकारी नितीन कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांच्या भूमिकेमुळे भाजप, राष्ट्रवादीत बंडखोरीची शक्यता वर्तवली जात आहे.
शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारपासून कालपर्यंत 25 जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. यात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किरण पाटील यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. ते 12 जानेवारीला पुन्हा अर्ज भरणार आहेत. तसेच विद्यमान आमदार विक्रम काळे आज अजित पवारांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करत आहे. याचवेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप सोळुंके यांनी, तर नांदेडमधील भाजपचे पदाधिकारी नितीन कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. या दोघांनी अजूनही अर्ज दाखल केलेलं नाहीत. मात्र त्यांनी अर्ज नेल्याने बंडखोरीची चर्चा रंगत आहे. त्यामुळे या दोघांची समज काढण्याचे पक्षासमोर आव्हान असणार असल्याचं सुद्धा बोलले जात आहे.
विक्रम काळे दाखल करणार अर्ज
गेल्या अठरा वर्षांपासून मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आणि विद्यमान आमदार विक्रम काळे यांना यंदाही राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये काळे हे आपला अर्ज दाखल करणार आहे. यासाठी पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. दरम्यान याचवेळी पक्षाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन देखील करण्याची तयारी केल्याचे पाहायला मिळत आहे. तर उद्या भाजपचे उमेदवार किरण पाटील अर्ज दाखल करणार आहे.
असा रंगणार सामना!
गेली कित्येक वर्षे मराठवाडा शिक्षक मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. त्यामुळे यावेळी देखील हा मतदारसंघ आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात आहे. तर दुसरीकडे भाजपकडून देखील हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. यासाठी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या किरण पाटील यांना भाजपकडून रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे विक्रम काळे विरुद्ध भाजपचे किरण पाटील असाच खरा सामना रंगणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: