एक्स्प्लोर

धक्कादायक! प्रेमसंबंध ठेवण्यासाठी घराशेजारी राहणाऱ्या महिलेचा तगादा; तरुणाने संपवलं जीवन

Aurangabad Crime News: आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या पत्नीच्या फर्यादीवरून शेजारी राहणाऱ्या महिलेवर बिडकीन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aurangabad Crime News: औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील लोहगाव येथे एक धक्कादायक घटना समोर आली असून, तीस वर्षाच्या तरुणांने गळाफास घेऊन आत्महत्या (Youth suicide) केली आहे. घराशेजारी राहणारी महिला प्रेम संबंध ठेवून लग्न करण्यास दबाव आणत असल्याने, या विवाहित तरुणाने आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलले आहे. गणेश सुभाष मुसळे (वय 30) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर गणेश याच्या पत्नीच्या फर्यादीवरून शेजारी राहणाऱ्या महिलेवर बिडकीन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश मुसळे हा गेल्या काही महिन्यांपासून पत्नीसह सासुरवाडी शरनापुर येथे टायर पंक्चर दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. दरम्यान दोन तीन दिवसांपूर्वीच गणेश आई वडिलांना भेटण्यासाठी आपल्या मूळगावी लोहगावला आला होता. शुक्रवारी रात्री आईवडील झोपी गेल्यावर उशीरा घरातील एका खोलीत गणेश याने गळफास घेऊन जीवन संपवलं. दरम्यान मध्यरात्री आईला जाग आली असता मुलाने गळफास घेतल्याचे उघडकीस आले.

पोलिसांची घटनास्थळी धाव...

गणेशच्या आत्महत्येची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत गणेश यास बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. रूग्णालयाच्या अहवालावरून बिडकीन पोलीस ठाण्यात सुरवातीला आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गणेशच्या पत्नीच्या फर्यादीवरून शेजारी राहणाऱ्या महिलेवर 306 प्रमाणे आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेजारच्या महिलेच्या छळाला कंटाळून केली आत्महत्या.... 

गणेशाच्या पत्नीने बिडकीन पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, गणेश मूसळे यास त्यांच्या शेजारी रहाणारी महिला तिच्यासोबत प्रेम संबंध ठेवून लग्न कर व स्वतःच्या पत्नीस सोडून दे अशा प्रकारचा वारंवार समक्ष व फोनवर तगादा लावून मारण्याच्या धमक्या देत असे. शेजारच्या महिलेच्या नेहमीच्या धमकीला आणि माणसिक त्रासाल कंटाळूनच गणेश याने आत्महत्या केली असल्याचं तिच्या पत्नीने पोलिसात दिलेल्या फर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार शेजारच्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. 

महत्वाच्या बातम्या...

Chardrapur Crime : आर्थिक विवंचनेतून दोन चिमुकल्यांना विष देत वडिलांनीही संपवलं आयुष्य

Aurangabad : पोलीस आयुक्त कार्यालयातचं महिलेने स्वतःला संपवलं; अखेर पाच लोकांवर गुन्हे दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP MajhaMarathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णयAjit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial ReportMahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Embed widget