Aurangabad: औरंगाबादच्या पोलिस हेड कॉन्स्टेबलची भन्नाट कामगिरी; उर्दूमध्ये मिळवली PHD
औरंगाबाद शहर पोलिस विभागात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले इरफान खान उस्मान खान यांनी जगप्रसिद्ध लेखक सय्यद इम्तियाज अली यांच्यावर पीएचडी केली आहे.
Aurangabad News: औरंगाबाद शहर पोलिस विभागात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले इरफान खान उस्मान खान यांनी भन्नाट कामगिरी करत, शहर पोलिसात दलात पहिले हेड कॉन्स्टेबल म्हणून पीएचडी धारक होण्याचे बहुमान मिळवला आहे. पोलीस दलात अनेक अधिकारी पीएचडी करतात, मात्र हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले इरफान यांनी उर्दूमध्ये मिळवलेल्या पीएचडीनंतर त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
इरफान खान यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएचडी ही शिक्षणातील सर्वोच्च पदवी प्रदान केली आहे. त्यामुळे इरफान हे पीएचडी पदवी मिळविणारे पहिले हेड कॉन्स्टेबल ठरले आहेत. खान यांनी या अगोदर उर्दू विषयांमध्ये मास्टर्स डिग्री तसेच जनसंवाद व पत्रकारिता मध्येही पदव्युत्तर पदवी मिळविलेली आहे. त्यांनतर त्यांनी जगप्रसिद्ध लेखक सय्यद इम्तियाज अली यांच्यावर पीएचडी करण्याचा निर्णय घेतला. पुढे “सय्यद इम्तियाज अली ताज की ड्रामा निगारी का तनखीदी व तजजियाती मुताअला” या विषयावर मौलाना आझाद महाविद्यालयाच्या उर्दू विभाग प्रमुख डॉ. काझी नवीद अहमद सिद्दिकी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएचडी उतीर्ण केली.
यामुळे घेतला पीएचडी करण्याचा निर्णय
याबाबतीत बोलतांना इरफान खान म्हणाले की, माझ्या आई-वडील आणि बायकोचा मला यासाठी खूप पाठींबा मिळाला. माजी सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. खुशालचंद बाहेती यांनी पीएचडी केल्याने मला तेथून याबाबत प्रेरणा मिळाली. नौकरी करून पीएचडी करतांना अनेक अधिकारी बदललेले, मात्र सर्वांनीच नेहमी सहकार्य केले. डिसेंबर 2014 ते जून 2022 पर्यंतचा काळ पीएचडी पूर्ण करण्यासाठी गेला. तर ज्यांच्यावर ही पीएचडी करण्यात आली ते जगप्रसिद्ध लेखक सय्यद इम्तियाज अली यांना जेवढी प्रसिद्धी मिळायला हवी होती, ती मिळाली नसल्याचे या संशोधनातून समोर आल्याच इरफान खान म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या...
Aurangabad: जायकवाडीत येणाऱ्या पाण्याची आवक घटली; पाणीसाठा 53 टक्क्यांवर
Aurangabad: औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाबाबत गडकरींची मोठी माहिती; 'त्या' चार गावांमधून ...