Yakub Memon Grave Controversy : यामुळेच आम्ही बाहेर पडलो, याकूब मेमन प्रकरणी संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया
Terrorist Yakub Memon Grave Controversy : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
![Yakub Memon Grave Controversy : यामुळेच आम्ही बाहेर पडलो, याकूब मेमन प्रकरणी संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया maharashtra News Aurangabad News MLA Sanjay Shirsat criticizes Mahavikas Aghadi in Yakub Memon Grave case Yakub Memon Grave Controversy : यामुळेच आम्ही बाहेर पडलो, याकूब मेमन प्रकरणी संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/08/9e642fc435d1fe3c44e74e961e883242166263206890889_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Terrorist Yakub Memon Grave Controversy : दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करून त्यावर रोषणाई करण्यात आल्याची बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झालं आहे. तर यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहे. दरम्यान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी यावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. गेल्या सरकारच्या अशाच चांगुलपणामुळे आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचा खोचक टोला शिरसाट यांनी लगावला आहे.
यावेळी बोलतांना शिरसाट म्हणाले की, अशाच सर्व कारणांमुळे आम्ही उद्धव ठाकरेंची साथ सोडून बाहेर पडलो आहे. हे काही चांगुलपणा मागच्या सरकारमध्ये सुरु होता, त्याचा आम्हाला त्रास होत होता. त्यामुळे आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. नवाब मलिक हे कशासाठी जेलमध्ये आहेत, दाऊद इब्राहिमच्या मनी लॉन्ड्रींगमध्ये त्यांचा सहभाग होता. तर दाऊदचे जे काही हस्तक असतील, त्याचे सहकारी असतील त्यांच्यासोबत बसने आम्हाला योग्य वाटत नव्हते त्यामुळे आम्ही उठाव केला, असे शिरसाट म्हणाले.
लोकांसमोर काय आदर्श ठेवणार?
ज्याने बॉम्बस्फोट घडवले, ज्याने नाहक अनेकांचे बळी घेतले त्याची कबर होणे हे महराष्ट्रासाठी दुखद घटना आहे. कालच मी एबीपी माझावर पाहिले की, याकूब मेमनची कबर अक्षरशः संगमरवरीच्या दगडाने बांधली जात आहे. त्यामुळे काय आदर्श ठेवणार लोकांसमोर. आमची आणि आमच्या पक्षाची हीच भूमिका आहे की, हे जे काही बांधकाम सुरु आहे ते अत्यंत चुकीचे आहे.
कारवाई झालीच पाहिजे?
याबाबत भाजपने काय भूमिका घेतली यावर मी बोलणार नाही. मात्र आमची भूमिका निश्चित आहे की, ज्यांनी हे सर्व करण्यासाठी परवानगी दिली, ज्यांच्या काळात हे झालं त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. उद्या बलात्कार आणि खुन करणाऱ्यांच्या कबरी बांधल्या जातील. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा मागणी करणार आहे की, सदरील प्रकरणाची कठोरात कठोर चौकशी करावी आणि एकनाथ शिंदे ते नक्की करतील, असेही शिरसाट म्हणाले. तसेच मुख्यमंत्री अशा गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून असतात. त्यांनी याची दखल सुद्धा घेतली असेल. कदाचित कारवाईला सुरवात सुद्धा झाली असेल अशी माझी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या कानावर एखांदी गोष्ट गेली तर त्याचा निकाल लागतोच,असेही शिरसाट म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या...
शिवसेनेनं कबर बचाव अभियान सुरू करावं; भाजपची टीका, 'याकूबच्या कबरी'वरुन उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)