एक्स्प्लोर

कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघात लम्पीचा थैमान, शेतकरी मेटाकुटीला; जनावरांना आरोग्य उपचारही मिळेना

Lumpy Skin Disease: सरकारकडून लम्पी आजार नियंत्रणात असल्याचा दावा केला जात असतांना, स्थनिक पातळीवर परिस्थिती वेगळीच पाहायला मिळत आहे.

Lumpy Skin Disease: राज्यात अजूनही जनावरांमधील लम्पीचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease) काही थांबताना दिसत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अहमदनगरनंतर आता कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याच मतदारसंघात लम्पीने अक्षरशः थैमान घातला असल्याची पाहायला मिळत आहे. 'लोकमत'ने दिलेल्या वृत्तानुसार सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील उपळी येथील 3 शेतकऱ्यांच्या जनावरांचा लम्पी आजाराने मृत्यू झाला. तर गावात सध्या 35 ते 40 जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

ग्रामीण भागात सद्या लम्पीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. तर सरकारकडून लम्पी आजार नियंत्रणात असल्याचा दावा सतत केला जात आहे. मात्र स्थनिक पातळीवर परिस्थिती वेगळीच पाहायला मिळत आहे. त्याचंच उदाहरण म्हणजे अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड तालुक्यातील उपळी म्हणून असलेलं गावातील परिस्थिती. कारण लम्पी आजाराने उपळीत थैमान घातले असून शेतकरी प्रकाश छगन मंडोरे यांचा बैल आठ दिवसांपूर्वी लम्पीने मरण पावला. तसेच रवींद्र सांडू जाधव यांची 50  हजार रुपयांची गाय 19  नोव्हेंबर रोजी तर हरी देवीदास शेजूळ यांचे 25  नोव्हेंबर रोजी वासरू व 26  नोव्हेंबर रोजी एक गाय यांचा मृत्यू झाला. त्यामुळे लम्पीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होण्यापेक्षा अधिक वाढत असल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

एकट्या गावात चाळीस जनावरं बाधित

सिल्लोडमधील उपळी गावातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कारण गावात लम्पी बाधित जनावरांची संख्या चाळीस पर्यंत पोहोचली असून, पशुवैद्यकीय विभागाकडून याची दखल घेतली गेली नाही. प्रशासनाकडून लसीकरणाचा दावा केला जात असला तरीही, या गावात लसीकरणासाठीही कोणतेही शिबिर आयोजित करण्यात आला नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तर पशुपालकांनी इतरत्र जाऊन आपल्या जनावरांना लसीकरण केले आहे. 

लसीकरण करूनही जनावरे बाधित...

जनावरांना लम्पीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र लसीकरण करूनही जनावरे बाधित होत असल्याचे समोर आल्याने शेतकरी हतबल झाले आहे.त्यात गावातील अनेक जनावरे बाधित झाल्याने आपापल्या जनावरांना सुरक्षित ठेवण्यासाठी पशुपालकांची धरपड सुरु आहे. त्यातच रब्बीचा हंगाम सुरु असून अशात जनावरांना लम्पीची लागण होत असल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी करत आहे. 

Lumpy Skin Disease : लम्पीमुळे संपूर्ण राज्यात जनावरे दगावण्याचं प्रमाण बुलढाण्यात सर्वाधिक, आतापर्यंत 3993 गुरे दगावली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Gadkari launch CNG Bike : CNG बाईक लाँच, महाराष्ट्रात किंमत किती? गडकरींचं Uncut भाषणTeam India Felicitation in Vidhan Bhavan : विश्वविजेत्या मुंबईकर खेळाडूंचा विधानभवनात सत्कारFirst CNG Bike review Pune : Nitin Gadkari यांनी लाँच केलेल्या पहिल्या सीएनजी बाईकचा रिव्ह्यूJob Majha : नॅशनल फर्टिलायइर्स लि. येथे विविध पदांसाठी भरती : 5 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
Embed widget