एक्स्प्लोर

चिंताजनक! मोबाइलच्या अतिवापरामुळे वडील रागावले, महाविद्यालयीन तरुणीने केली आत्महत्या

Aurangabad Crime News: विष प्राशन करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीवर उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे तीचा मृत्यू झाला आहे.

Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरात (Aurangabad City) समोर आलेल्या एका घटनेने खळबळ उडाली आहे. मोबाइलच्या (Mobile) अतिवापरामुळे वडील रागावल्याने 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या (College Girl Committed Suicide) करण्याचा प्रयत्न केला होता. तर बुधवारी पहाटे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे. शहरातील गारखेडा परिसरातील न्यू हनुमाननगरमध्ये ही घटना घडली आहे. आरती सुनील सिदलंबे ( वय 20 वर्षे, रा.  न्यू हनुमाननगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गारखेड्यातील न्यू हनुमाननगरमध्ये कुटुंबासह राहणारी आरती पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. दरम्यान 18 डिसेंबरला सुनील सिदलंबे हे काम आटोपून घरी परतले. त्यावेळी त्यांना आरतीच्या हातात मोबाइल दिसला. मोबाइलच्या अतिवापरामुळे आई-वडिलांनी आरतीला अनेकदा समजावून सांगितले होते. मात्र आरतीच्या अति मोबाईल वापरण्याची सवय काही कमी झाली नाही. त्यामुळे रविवारी आरतीच्या हातात मोबाइल पाहून वडील तिला पुन्हा रागावले आणि याचाच राग मनात धरत आरतीने टोकाचे पाऊल उचलेले. 

अन् आरतीने विष प्राशन केलं...

आरतीच्या हातातील मोबाईल पाहून वडील तिला रागवले. त्यामुळे याचा राग आल्याने आरती थेट आतील खोलीत निघून गेली.  खोलीत गेलेल्या आरतीने थेट विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार आई-वडिलांच्या लक्षात येताच आरतीला एमआयटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तिला घाटी रुग्णालयात हलवण्यात आले होते. आयसीयूमध्ये दाखल असलेल्या आरतीवर उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. 

पालकांची चिंता वाढवणारी बातमी... 

या घटनेने पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. मुलांना लागलेले मोबाइलचे व्यसन ही पालकांसाठी सर्वाधिक चिंतेची बाब बनली असल्याचे चित्र सद्या पाहायला मिळत आहे. मुलांमध्ये हिंसेच्या घटनांमध्ये सध्या सर्वाधिक कारण मोबाइल व्यसन असल्याचे देखील अनेकदा समोर येत आहे.  आठवी ते पदवीचे शिक्षण घेणारे तरुण, तरुणी सर्वाधिक मोबाईलच्या आहारी गेल्याचे समोर येत आहेत. तर पालक स्वत: मोबाइलपासून दूर राहिल्यास याचा पाल्यावरही सकारात्मक परिणाम होतोम असे मत  मानसोपचातरज्ज्ञ यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

Aurangabad: एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, संतापजनक घटनेनं औरंगाबाद हादरलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaPankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटलाCm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget