एक्स्प्लोर

MIM Protest: शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, एमआयएमकडून औरंगाबादमध्ये धरणे आंदोलन

MIM Protest Aurangabad: यावेळी भाजप नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

MIM Protest Aurangabad: भाजप (BJP) नेते आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यभरात संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून रस्त्यावर उतरून आंदोलन केले जात आहे. दरम्यान आता एमआयएमकडून देखील रस्त्यावर उतरून आंदोलन केले जात आहे. औरंगाबादमध्ये आज शहरातील क्रांती चौकात एमआयएमकडून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

यावेळी 'भाजप हटाव देश बचाव' अशा घोषणाबाजी करण्यात आली. तर शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. तसेच राज्यपाल यांना राज्यातून परत पाठवण्याची देखील मागणी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केली. तर शिवाजी महाराज यांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नसल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. यावेळी एमआयएम कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. 

राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव 

यावेळी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सोबतच राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव असे होर्डिंग कार्यकर्त्यांच्या हातात पाहायला मिळाले. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान सहन केला जाणार नसल्याचं उल्लेख असलेले बॅनर देखील यावेळी पाहायला मिळाले. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. 

एमआयएमची प्रतिक्रिया...

यावेळी बोलतांना एमआयएमचे शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाची आण बाण शान आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले जात असतील ते महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. शिवाजी महाराज यांना आम्ही हिरो मानतो. त्यामुळे भाजपसाठी शिवाजी महाराज मोठे आहेत की, कोश्यारी मोठे आहेत हे त्यांनी स्पष्ट करावे. तर राज्यपाल कोश्यारी यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी देखील यावेळी नक्शबंदी यांनी यावेळी केली.  

जलील यांचीही टीका... 

दरम्यान यावर बोलतांना जलील यांनी देखील भाजपवर टीका केली आहे. यावर बोलतांना ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही मंत्र्याला यापुढे कोणत्याही कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचे अधिकार नसायला पाहिजे. भाजपसाठी कोश्यारी महत्वाचे आहेत की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर महत्वाचा ही आता त्यांच्यासाठी परीक्षा आहे. त्यामुळे या परीक्षेत पास व्हायचं की, नापास हे त्यांच्या  हातात असल्याचा इशारा जलील यांनी भाजपला दिला आहे. आमच्यासोबत राजकीय मतभेद काहीही असू द्या, मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल होणारे वादग्रस्त विधान आम्ही सहन करणार नसल्याचं खासदार जलील म्हणाले.

मोठी बातमी! औरंगाबादमध्ये मनसे आक्रमक, कर्नाटक बँकेला फासलं काळे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मंत्रिपदापेक्षा मला जास्त जवळचे; नाराज विजय शिवतारेंचे सूर बदलले
एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मंत्रिपदापेक्षा मला जास्त जवळचे; नाराज विजय शिवतारेंचे सूर बदलले
भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | माझ्या भावाचे मारेकऱ्यांना जेरबंद करा, संतोष देशमुखांच्या भावाची आर्त हाकAaditya Thackeray Meet Pravin Darekar : हसले, खिदळले, फोटो काढले; दरेकर आदित्य ठाकरेंना काय बोलले?Anna Bansode Pimpri-Chinchwad : मंत्रिपद मिळालं नाही, अण्णा बनसोडे नाराजRanajagjitsinha Patil Nagpur : तुळजापूर प्रकरणात नेमकं काय घडलं, राणा जगजीतसिंह पाटील म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मंत्रिपदापेक्षा मला जास्त जवळचे; नाराज विजय शिवतारेंचे सूर बदलले
एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मंत्रिपदापेक्षा मला जास्त जवळचे; नाराज विजय शिवतारेंचे सूर बदलले
भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
Ravichandran Ashwin: तर मला हार्ट अटॅक आला असता...आर. अश्विन कॉल हिस्ट्री शेअर करत हे काय बोलून गेला? 
सचिन अन् कपिल देवचं नाव घेतलं, स्क्रीन शॉट शेअर केला, अश्विन म्हणाला तेव्हा मला हार्ट अटॅक आला असता....
संतोष देशमुखसारखं काही...; घर अन् सामना कार्यालयाची रेकी, संजय राऊत संतापले, म्हणाले सुरक्षाही काढली
संतोष देशमुखसारखं काही...; घर अन् सामना कार्यालयाची रेकी, संजय राऊत संतापले, म्हणाले सुरक्षाही काढली
Gold Rate Update : सोने दरात MCX वर तेजी पण सराफा बाजारात घसरण, 300 पासून 650 रुपयांपर्यंत दर घसरले
सोने दरात मोठी घसरण, चांदीचे दरही घसरले, MCX अन् सराफा बाजारात वेगळं चित्र
मनसेनं थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका; मराठी माणसाला मारहाण, राज ठाकरे संतापले, थेट इशारा
मनसेनं थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका; मराठी माणसाला मारहाण, राज ठाकरे संतापले, थेट इशारा
Embed widget